शिवरायाचे आठवावे स्वरुप | शिवरायाचा आठवावा साक्षेप |
शिवरायाचा आठवावा प्रताप | भूमंडळी ||
- समर्थ रामदास
आपल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराज आभाळा एवढे कार्य करून याच मातीत काळाच्या पडद्याआड गेले आणि या मातीस पावन केले. याच पुण्य भुमीचे आपण वारस. शिवबाच्या तलवारीने मुघलांची क्षितिजे निस्तरली. असा हा "शिवकल्याण राजा" हिमालया एवढी उत्तुंग उंची गाठू शकला, केवळ रयतेच्या कल्याणाचा ध्यास मनी ठेऊनच. आजच्या राजकर्त्यांच्या कार्याची तुलना छत्रपतींच्या मुळ उद्देशाशी होताना दिसत नाहिये. शिवकार्याचा राजकीय वापर करण्यापेक्षा आज शिवाजी महाराजांच्या ध्येयाशी मिळवुन घेऊन आजची ध्येयधोरणे जर ठरवली गेली तर शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील "रयतेचे राज्य" येण्यास वेळ लागणार नाही. परंतू हे शिवधनुष्य पेलणार तरी कोण.? त्यासाठी त्याच धडाडीच्या कार्यकर्त्यांची आज परत एकदा या शिवभूमीला गरज पडते आहे.