"स्पृहा" ह्या पुस्तकात वेगवेगळ्या आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या गोष्टींना अनुभवून लिहिलेल्या कथा आहेत. जास्त स्त्रीविशेष कथा आहेत त्यात स्पृहा ही जरा खास आहे. आजकाल सगळयाच गृहिणी स्पृहाच्याच परिस्थितीतून जाताना दिसतात. बाळंतपणानंतर तिच्या शरिरात झालेले बदल मस्तीत तर कधी तिरस्काराने घेतले जातात तसं पाहायला गेल तर जाड व्हायला कुणाला आवडेल ना? त्यांना गरज असते समजून घेण्याची तसेच सोबतीची. अशाच वेगवेगळ्या छटा असलेल्या कथा तुम्हाला ह्या पुस्तकात वाचायला मिळतील.