भारत देश जवळजवळ चौदाशे वर्ष वेगवेगळ्या प्रांतात आणि भागात पारतंत्र्य अनुभवत होता. स्वातंत्र्य भारताला पुर्वेकडील नवा उगवता तारा असे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संबोधीत केले होते. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज देशापुढे असलेल्या ज्वलंत समस्यांचा विचारपूर्वक आढावा घेऊन एक वैचारिक सिंहावलोकन होणे गरजेचे आहे. त्याचाच संक्षिप्त आढावा विविध लेखकांच्या लेखाच्या माध्यमातून या पुस्कात घेण्यात आला आहे.