'ती' जिने हे करिअर निवडलं; तिला आलेले अडथळे आणि अर्थात कॉलेज जीवनामधील गुलाबी दिवस, अनेकांना आपल्या दिवसांची आठवण करून देतील.
इथून कथा एका वेगळ्या वळणावर जाते. ती आणि तिचा भाऊ दोघांचाही प्रेमाच्या वाटेवरचा प्रवास, भावाच दत्तक असणं, स्वतःच्या रंगावरून दुखावला गेलेला स्वाभिमान, यातून कणखरपणे उभी राहिलेली ती - खरंच वाचण्यासारखी आहे.
अचानक आयुष्यामध्ये आलेला बालपणीचा मित्र तिच्या जीवनाची गणितं बरोबर करेल का चुकवेल? तिच्या भावाच्या दत्तक असण्यामुळे भविष्यावर आलेलं प्रश्नचिन्ह मिटेल का? घरातील चौथ्या पिढीपर्यंत पोहोचलेला हा 'नाही कळले कधीचा' हा प्रवास तितकाच नात्यांना बांधून ठेवणारा ठरेल का?
या सर्व प्रश्नांची उत्तर अर्थातच 'अतूट बंध'.