रात्री ९ ते १२ चा शो बघून तो सिनेमा थिएटर मधून बाहेर पडला . एकटाच ! अर्थात गर्दी होतीच ,पण एवढ्या गर्दीत ही तो एकटाच होता ! त्याला आई शिवाय कुणी नव्हतं ! आणि आईला ही याच्याशिवाय कुणी नव्हतं ! .....
त्याचं लक्ष समोर गेलं . समोर एक ब्रिज होता आणि ब्रिजवर कुणी होतं ! तसा ब्रिज जुना होता ! म्हणजे आता वापरात नव्हता ! त्याने निरखून पाहिलं . ती व्यक्ती ब्रिजच्या कठड्यावर चढण्याचा प्रयत्न करत होती !
याची ट्यूब पेटली . ' आत्महत्या ?'.....