जीवनाची भयावहता, अनर्थपूर्णता जशी बा. सी. मर्ढेकरांना जाणवली होती, तशी नव्या युगात डॉ. सुधीर देवरे यांना जाणवत आहे. अनुभूतीच्या अवकाश संदर्भात ध्वनीविन्यास, वाक्यविन्यास, वाक्यार्थ स्तरावर कवी हे सर्व बा. सी. मर्ढेकरांप्रमाणे अपरिचितीकरण साधतो. आंतरिक डंख, विलक्षण बाह्य घटना, व्यक्तिनिष्ठ विसंगती, विचार ह्या मधून ही कविता जन्म घेते. मोजक्या शब्दांचा तिरकस (वक्रोतीपूर्ण) उपयोजन करुन तरळ भावस्थितीचे चित्रण ह्या संग्रहात येते. त्याला Personification चा स्तर लाभतो. कवीची अनुभूती जीवनमूल्य- र्हासाबरोबर सत्याचा शोध घेते. - डॉ. शशिकान्त लोखंडे
डॉ. सुधीर देवरे हे कवी, साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक असून भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे संशोधक आहेत. आतापर्यंत त्यांचे वीस पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या ‘डंख व्यालेलं अवकाश’ या कवितासंग्रहाची बावीस वर्षांनंतरची ही दुसरी आवृत्ती. सामाजिक भान, नैसर्गिक विद्रोहहीन अल्पाक्षरी भाषा, अहिराणी उच्चार, आपलीच समजूत घालणारा जीवन संघर्ष, डंखांच्या वेदना कुरवाळणारी चिंतनात्मक कविता आदी या कवितेची वैशिष्ट्ये सांगता येतील. - नोशन प्रेस, चेन्नई
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners