दुष्टचक्र हा चित्तथरारक भयकथांचा संग्रह वाचकांसाठी सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. यातील प्रत्येक कथा एक प्रकारचा संदेश वाचकाला देते.
दुष्टचक्र या कथेत व्यक्तीच्या वाईट कर्मांचे फळ त्याच्या आप्तस्वकियांना कसे भोगावे लागते, हे मांडले आहे.
व्यक्तीच्या अंतर्मनातील अपराधी भावनांची आंदोलनं, त्यामुळे तिला होणारे आभास, याचे चित्रण आभास या कथेत आहे.
अन्याय आणि अत्याचाराला बळी पडलेल्या अतृप्त स्त्रीची व्यथा ती कोण होती??? या कथेत अधोरेखित आहे.<