गर्भावस्था ही एक नैसर्गिक व आनंददायी प्रक्रिया आहे. स्त्रीला निसर्गाने दिलेली मातृत्वाची ती एक अनमोल देणगी आहे. त्यामुळे गर्भधारणा झाल्याचे कळल्यावर जबाबदारीच्या जाणीवेने घाबरून जाण्याचे किंवा संकोचून जाण्याचे कारण नाही. उलट, या येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी कशी करायची किंवा, हे होणारे बाळ सुदृढ, आरोग्यदायी होण्यासाठी गर्भवती मातेनी कशा तऱ्हेने काळजी घ्यायची याचा विचार करायला हवा.
स्त्रीची गर्भावस्था, त्यावेळी होणारे शारीरिक बदल, बाळाची गर्भातील