आनंदी आणि सुखसमृद्धीचे जीवन जगणे हा प्रत्येक मानवाचा मुलभूत अधिकार आहे. श्रीमंत होणे, नावलौकिक मिळविणे आणि सुखी व संपन्न जीवन जगणे ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. पैसा कमविणे आणि नाव कमावणे ह्या मध्ये सर्वसामन्य माणूस गुरफटल्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे श्रीमंत होऊनही अनेक व्यक्ती सुखी व समाधानी होऊ शकत नाहीत.
समृद्धी आणि मानसिक शांतीचे जीवन जगण्याचा मार्ग हा कुटुंबातूनच जातो हे सार पुस्तकातून मांडण्यात आले आहे. साध्या आणि सरळ सूत्रांच्या माध्य