Share this book with your friends

Olakh / ओळख - सायबर साक्षर मासिक ऑक्टोबर २०२२ Cyber Sakshar Magazine Oct 2022

Author Name: Onkar Gandhe | Format: Paperback | Genre : Educational & Professional | Other Details

सध्याचे माहिती तंत्रज्ञानाचे जग हे खूप बदलते जग आहे. कोणतीही गोष्ट स्थिर अशी नाही. पण या अस्थिर अशा जगात आपल्याला इंटरनेट मात्र स्थिर आणि सारखे हवे असते; किंबहुना इंटरनेटची गरज भासते.

अगदी छोटासा मेसेज पाठ्वण्यापासून तर विमानाचे तिकीट बुक करण्यापर्यंत सर्व कामे इंटरनेटच्या माध्यमातून करावी लागतात. मेसेज पाठवणे, कामाचे ईमेल करणे, फोटो शेयर करणे, व्हिडीओ पाहणे, गाणे ऐकणे, पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचणे, पैसे काढणे, पैसे पाठवणे, खरेदी करणे अशा अनेक आणि असंख्य कामांसाठी आपण इंटरनेट वापरत असतो, तेही घरबसल्या!

आता जर आपण इंटरनेटचा एवढा अफाट वापर करतो, तर त्यासोबत धोके हे असणारच. इंटरनेटवर फुटाफुटावर सायबर धोके आ वासून उभे असतात. त्या धोक्यांना घाबरून आपण इंटरनेट वापरणे किंवा इंटरनेटवरील कामे थांबवू शकत नाही. त्या ऐवजी आपल्याला गरज आहे, ती काळजी घेण्याची! म्हणजेच सायबर सुरक्षिततेची.

वाढत्या धोक्यांसोबत आपल्याला गरज आहे ती सायबर साक्षर होण्याची!

Read More...
Paperback

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

ओंकार गंधे

ओंकार गंधे हे सायबर सुरक्षा क्षेत्रातील एक उल्लेखनीय व्यक्ती आहे. ओंकार गंधे हे तीन आयटी नवीन व्यवसायांमागील अग्रणी आहेत. नाशिक, महाराष्ट्र येथे सायबर साक्षरची स्थापना करून, ओंकार गंधे युवकांना सायबर सुरक्षा क्षेत्रात त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तयार करत आहेत.

इंटरनेट ही मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाची प्रगती आहे, तरीही तंत्रज्ञानाने ज्या प्रकारे जगभरातील हजारो लोकांना पूर्णपणे वेठीस धरले आहे ते आपल्याला अशा आधुनिक जीवन पद्धतींमध्ये ज्ञान शिकण्याच्या व्यक्तीच्या क्षमतेबद्दल बरेच काही सांगते. मोठ्या संख्येने लोकांना, विशेषतः सायबर सुरक्षा क्षेत्रात गरीब असलेल्यांना मदत करण्याच्या इच्छेने 7 वर्षांहून अधिक काळ काम करणे, हे मान्यताप्राप्त सायबर साक्षरच्या संस्थापकाचे ध्येय आहे.

ओंकार गंधे एक सायबर सुरक्षा तज्ञ, डिजिटल मीडिया मार्केटिंग सल्लागार, लेखक आणि एक उद्योजक आहे.

Read More...

Achievements

+1 more
View All