Share this book with your friends

Streetva / स्त्रीत्व An UNwanted Strength

Author Name: Prrajakkta Patil | Format: Paperback | Genre : Biographies & Autobiographies | Other Details

हे पुस्तक अपेक्षांच्या जंगलात अडकलेल्या स्त्रियांच्या वास्तविक जीवनातील कथा सांगते. मुली, बहिणी, सून, आई इत्यादी नात्यांवर पाडल्या जाणार्‍या दबावामुळे, खूप समस्या उद्भवतात. या जगामध्ये कोणतीही स्त्री समाजाच्या कठोर परिस्थितीशिवाय जगली नाही. 

या कथा त्यांच्या वेदनादायक अनुभवांबद्दल बोलतील आणि अखेरीस त्यांच्या अमर्याद बलिदानासाठी आवाज उठवतील.

हे निर्बंध आणि क्रूर वागणूक, आयुष्याची गुणवत्ता, शांतता आणि पुरोगामी मानसिकतेमध्ये व्यत्यय आणतात. आयुष्याच्या वैयक्तिक, सामाजिक आणि करिअरच्या पैलूंमध्ये शेवटी समस्या निर्माण होतात. यामुळे वैयक्तिक प्रगती होण्यास मदत होते का? नाही! हे केवळ अविस्मरणीय दुःख आणि नैराश्य आणते. हे प्रसंग आपल्या स्वाभिमान आणि आत्मविश्वासावर गदा आणतात. 

मग आपण का बदलत नाही? काही सोपे उपाय, या समस्या स्पष्टपणे सोडवू शकतात आणि असंख्य आयुष्य जगण्यायोग्य बनवू शकतात. बदलत्या युगानुसार, जीवनशैली आणि मानसिकता बदलून, व्यापक मनाने स्वीकारली पाहिजे. या पुस्तकात प्रत्येक कथेत, उपाययोजना ही दिल्या आहेत, जी प्रत्येक व्यक्तीला फक्त भावनाप्रधान न करता, सुज्ञपणे वागण्यास मदत करेल.

आयुष्यातील अनावश्यक अंधकारमय घटना व मानसिक आजार टाळण्यासाठी, कृपया हे पुस्तक विस्तृत दृष्टीकोनाने वाचा व आयुष्य वाचवा.

हे कोणत्याही स्त्रियांच्या सामाजिक स्तरावर आधारित नाही. या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट आहे, सामाजिक जागरूकता निर्माण करणे आणि सर्व जीवन सुखी करणे.

Read More...
Paperback

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

प्राजक्ता पाटील

प्राजक्ता पाटील, ह्या पुण्यातील स्थायिक लेखिका आहेत, ज्या आर्किटेक्ट आणि स्पिरिच्युरल हिलर म्हणूनही काम करतात.

हे पुस्तक जगातील सर्व स्त्रियांना समर्पित करणारे, त्यांचे पहिले पुस्तक आहे. तसेच, मानसिक किंवा शारीरिक छळ झालेल्या महिलांसाठी जनजागृती करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

हे पुस्तक त्या स्त्रियांच्या दैनंदिन जीवनावर नक्कीच थोडा प्रकाश टाकेल व ज्या ढोंगीपणाला तोंड देण्यासाठी त्या संघर्ष करत असतात, त्यासाठी त्यांना भक्कम आत्मविश्वास देईल.

Read More...

Achievements

+1 more
View All