“अरे खोप्या मध्ये खोपा” ही कविता शिकवली होती ती कविता ऐकल्या क्षणी माझ्या मनातच बसुन गेली आणि तेव्हा मी ती कविता पाठ केली आणि तसच लिहायचा प्रयत्न केला पन लिहता कही जमलं नाही एक घंटा झाला दोन घंटे झाले काही सुचेनाच झालं राघाच्या भरात ती वही फेकुन दिली आणि नंतर कधी कविता लिहायचा प्रयत्नही केला नाही वर्ष झाला दोन वर्ष झाले काहीच नाही मंग पाच वर्षा नंतर Lockdown लागला एक दिवस घरात बसुन-बसुन कंटाळा आला होता लाईट गेली होती आणि मुसळधार पाऊस पडत होता तेव्हा देव जाने कस काय एक कडवं मनात आलं आणि ते कडवं होतं “आला पावसाचा ह्रतु मनी आनंदी आनंद” आणि मंग नंतर पुढे लिहत गेलो आणि चार कडव्यांची एक कविता झाली मंग असंच करत करत लिहु लागलो पुढे आणि लिहताना वाटलं आपन जगलेल्या वास्तवावर लिहावं म्हणून प्रेमाच्या सोडुन सा-या कविता जे मी पाहीलं त्या घटनेवर लिहिल्या आणि ह्या कवितांच वेड लागलं ते म्हनजे ‘बहीनाबाई चौधरी’ मुळे आणि कविता लिहताना पुर्ण पने साथ देना-या वडीलांन मुळे ह्रदयविका-याच्या झटक्याने 2021 मध्ये आमचे बाबा आम्हाला सोडुन गेले म्हणून हा माझ्या जीवनातला पहीला काव्यसंग्रह मी माझे बाबा कै. चंद्रकांत तुकाराम तांब्रे आणि माझे काका कै. रमेश तुकाराम तांब्रे यांना अर्पण करीतो.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners