“ माइकशप्पथ करेक्ट “ हा एक प्रयत्न आहे लोकसंवादापुर्वी कराव्या लागणार्या पुर्वतयारीचा. कोणताही लोकसंवाद हा विविध परिस्थितींच्या अनुषंगाने करावयाचा एक नित्यजागर असतो . अशा संवादातुन आपल्या परिजनांना, अनुयायांना तसेच विरोधी विचारसरणीच्या आपल्या भोवतालच्या व्यक्तींना आपण आपलं त्या परिस्थितीविषयीचं आकलन , अभ्यास, निर्णय आणि प्रबंधन यांची ओळख करून देतो . एका जाग्रुत लोकधारेमधे मतमतांच्या प्रागैतिक प्रवाहातुन विचारांची सुस्पष्ट देवाण घेवाण होते आणि त्यातुन कित्येक वैचारिक मतभेद वा हेवेदावे संपुष्टात येतात. याचसोबत सामाजिक संवेदना, एकात्मता आणि समसमान संधींचे निर्हेतुक हस्तांतरण होते आणि त्यातुन समाजमनाची शाश्वत व्रुद्धी होऊ लागते. लोकसंवादाची कौशल्ये अंगी बाणणं हे आजच्या तंत्रज्ञानप्रिय जगात अत्याधिक महत्वाचं झालं आहे कारण एक प्रतिनिधी म्हणुन आपल्याला बर्याच वेळा लोकसंवादातुनच आपली भुमिका जाहीर करावी लागते आणि काही प्रश्नोत्तरांच्या सत्राला आत्मविश्वासानं सामोरं जावं लागतं. हे पुस्तक आणि त्यातले २२१ उत्तम उतारे अशा प्रसंगांसाठी नक्कीच प्रभावी ठरतील असा आम्हाला विश्वास आहे .