Share this book with your friends

31, Gulaalpeth - Tatva-Bajee-Maat-Jait ! (Purvardha ) / ३१, गुलालपेठ - तत्व -बाजी- मात - जैत ! (पुर्वार्ध )

Author Name: Prasad Prakash Tupache | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

३१ ,गुलालपेठ ही साहित्यक्रुती  राजकारणाच्या अष्टपैलु आयामांना सरळ , साध्या आणि सोप्या विचारांतुन प्रवाही पद्धतीने मांडणारा एक कला प्रयोग आहे . काल्पनिक कथांच्या आणि स्वरचित पात्रांच्या माध्यमातुन विविध राजकीय प्रसंगांमधील कटिबद्धता, समर्पण , मुत्सद्देगिरी, समयसुचकता, हजर जबाबीपणा, संघटन कौशल्य, सचोटी, खंबीरपणा,नियोजन , क्रुती आणि खेळीमेळीचं वातावरण जपुन बहुजन हितायच्या द्रुष्टीने पुढे पुढे चाललेली राजकीय नेत्यांची आणि समाजघटकांची प्रागैतिक  वाटचाल ३१ कथांच्या माध्यमातुन उलघडली आहे . राजकारणात गुलाल हे विजयाचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे ३१, गुलालपेठ या राजकीय काल्पनिक कथासंग्रहातुन एखाद्या धीरोदात्त नेत्याची वादळी विजयी वाटचाल कशी असते हे सांगण्याचा छोटा प्रयत्न केला आहे . संग्रहातली मते पुर्णत: व्यक्तीगत आहेत . ती व्यक्त करताना पुरेसं विचारमंथन केलं गेलं आहे . त्यामुळे हा संग्रह हाताळताना दर्जेदार राजकीय रपेट घडेल यात शंका वाटत नाही. 

Read More...
Paperback
Paperback 500

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

प्रसाद प्रकाश तुपचे

‘ओम गण गण लंबोदरा’ ,‘जिद्देजिगर ‘ , ‘एक्का’ या तीन  मराठी संग्रहानंतर लेखक श्री. प्रसाद प्रकाश तुपचे आपला चौथा मराठी संग्रह घेऊन आले आहेत. पेशाने अभियंता असलेले लेखक आपल्या स्रुजनशील लेखनातुन प्रेरक, क्रुतीशील आणि साहसी विचारधारेला अनुसरून लोककथांच्या माध्यमातुन आपली लेखनकला सादर करतात. एक विचार , एक आचार आणि अनेक व्यवसाय यामधे यशस्वी  आयुष्य बांधलेलं असतं. मोकळ्या वेळात केलं गेलेलं स्रुजनशील वाचन नेहमीच नव्या संकल्पनांना यशोधारेत सामावुन घेण्यास अधिकाधिक मजबुत करतं. याच सशक्तीकरणासाठी ही रचना सहर्ष  सादर !  

Read More...

Achievements