Share this book with your friends

Animal Communication / ॲनिमल कम्युनिकेशन प्राण्यांसोबतच्या दुतर्फी टेलिपॅथिक संवादाकरिता मार्गदर्शक पुस्तक/ A Guide to Two-Way Telepathic Communication with Animals

Author Name: Akshaya V. Kawle | Format: Paperback | Genre : BODY, MIND & SPIRIT | Other Details

ॲनिमल कम्युनिकेशन ही मानवाला लाभलेली निसर्गदत्त देणगी आहे. टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन बद्दल तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नाची उत्तरं या पुस्तका मध्ये मिळेतील. या पुस्तका मध्ये जिवंत तसंच दिवंगत प्राण्यांशी संवाद कशाप्रकारे साधावा, त्यांच्या वर्तन आणि आरोग्य विषयक समस्या, हरवलेल्या प्राण्यांच्या केसेस कशाप्रकारे हाताळाव्यात, ॲनिमल कम्युनिकेशनच्या मुलभूत संकल्पना समजून घेऊन या प्रवासामधील पुढील टप्पा कशाप्रकारे गाठावा यासारख्या महत्वपूर्ण विषयांचा खोलवर परामर्ष घेण्यात आला आहे.
या पुस्तकामध्ये मानवी मनाच्या काही सुप्त कौशल्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला प्राण्यांचं विश्व आणि आपल्या विश्वाच्या हातात हात घालून चालणारे त्यांचे व्यवहार याबद्दल स्पष्ट कल्पना येईल.
      प्रत्यक्ष आयुष्यातील अमूल्य अनुभवांच्या सोबत हे पुस्तक आपल्या प्राण्यांशी टेलिपॅथिक संवाद साधू इच्छिणार्‍या नवागतांसाठी तसंच अनुभवी पालकांसाठी एक उत्कृष्ठ मार्गदर्शक ठरू शकेल.

Read More...
Paperback
Paperback 549

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

अक्षया वि. कवळे

अक्षया विकास कवळेया मुंबई स्थित टेलिपॅथिक कम्युनिकेशन क्षेत्रामधील तज्ञ आहेत. त्या व्यावसायिक ॲनिमल कम्युनिकेटर म्हणून प्रॅक्टिस करतात.
      त्यांना कॉर्पोरेट ट्रेनिंग कन्सल्टंट म्हणून अकरा वर्षांचा अनुभव आहे. प्राणी आणि माणसांसोबतच्या कम्युनिकेशन विषयाशी निगडीत अनेक सर्टीफिकेटस त्यांच्याकडे आहेत. विविध प्रकारच्या हिलींगचा त्यांनी खोलवर अभ्यास केला आहे.
      निपुण ॲनिमल कम्युनिकेटर असण्या सोबतच अक्षया लोकांना काळासोबत लोप पावत चाललेल्या टेलिपॅथी या सुंदर संवाद भाषेचं प्रशिक्षणदेखिल देतात.
      मायाळू मुलगी, प्रेमळ पत्नी, अनेक प्राण्यांची पालक आणि जगभरातल्या अनेक विद्यार्थ्यांची उत्कृष्ठ गुरू असणाऱ्या अक्षयाने आपला प्रदीर्घ अनुभव आणि अतुलनीय ज्ञान या पुस्तकाच्या माध्यमातून शब्दबद्ध केलं आहे, ज्यामधून तुम्ही खूप काही शिकू शकाल आणि आत्मसात करू शकाल.

Read More...

Achievements

+12 more
View All