Share this book with your friends

Anxiety Ta Ta Bye Bye / अँग्झायटी टा टा बाय बाय : किशोर व तरुणांसाठी कवितांचा सचित्र संग्रह ताराचे ५० उपाय ज्यांच्या मदतीने वाघूने अँग्झायटीवर विजय मिळवला (Marathi Edition)

Author Name: Parag Dhruva Pandey | Format: Paperback | Genre : Young Adult Nonfiction | Other Details

“‘असं करा’ आणि ‘तसं करू नका’ असं प्रकारच्या मानसिक स्वास्थ्याविषयीच्या पुस्तकांपेक्षा हे पुस्तक वेगळं आहे. वाचकांनी वाचायला एकदा सुरवात केल्यावर त्यांना हे शेवटपर्यंत वाचायला हवं असं वाटेल.”

“मलासुद्धा कुणी तरी या सगळ्या लहान-मोठ्या गोष्टी आधी सांगितल्या असत्या तर मलाही अँग्झायटीशी लढण्यामध्ये मोठी मदत झाली असती.”

“या पुस्तकाचं सौंदर्य हे आहे की एका कठीण विषयावर चित्रं आणि कवितांचा उपयोग करून खूप सोप्या, आकर्षक आणि सकारात्मक पद्धतीने मतं मांडली आहेत.”

“हे पुस्तक किशोर व तरुणांसाठी लिहिलं गेलं आहे पण प्रौढांनाही याचा उपयोग होऊ शकतो.”

“लेखकाच्या व्यक्तिगत अनुभवांच्या आधारावर उभे राहिलेले हे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सच्या मदतीने लिहिलेले व चित्रित केलेले असे पहिले पुस्तक असावे.”

“चिंतेने घेरले गेल्यानंतर बहुधा भयाच्या पलीकडे पहाणे अवघड होऊन जाते. हे पुस्तक अलगदपणे तुमचा हात धरते आणि तुम्हाला अधिक चांगल्या भविष्याकडे घेऊन जाते.”

“हे पुस्तक जगलेल्या अनुभवांतून निर्माण झालेलं आहे, हे स्पष्ट आहे. याचं सर्वांत चांगलं वैशिष्ट्य म्हणजे ते कुठल्याही न्यायनिवाड्याची गोष्ट करत नाही.”

Read More...
Paperback
Paperback 249

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

पराग ध्रुव पांडेय

माझे नाव पराग आहे आणि मी माझी पत्नी व दोन मुली यांच्यासह पश्चिम भारतात मुंबईजवळ ठाणे इथे राहतो. मी व्यवसायाने ह्यूमन रिसोअर्सेस कन्सल्टंट आहे. मी माझ्या क्लायंट ऑर्गनायझेशनमधील लोकांना अधिक चांगले काम करण्यासाठी व  अधिक चांगले होण्यासाठी मदत करतो.

पँडेमिकच्या काळात एका प्रिय व्यक्तीचे अँग्झायटी व पॅनिक डिसॉर्डर असे निदान झाले, तेव्हा आम्ही, आमच्या परिवाराने त्याविषयी अधिक शिक्षण घ्यायचे व या विकाराशी एकत्रितपणे जास्तीत जास्त संघर्ष करायचा, असे ठरवले. सातत्याने दोन वर्षे प्रयत्न केल्यानंतर डॉक्टर, उपचारतज्ज्ञ, मित्र व नातेवाईक यांच्या मदतीने आम्हाला यश आले आणि आमची प्रिय व्यक्ती बरी झाली. तेव्हा आम्ही ठरवले की फक्त दुर्दैव असे म्हणून आमचे संघर्ष सोडून द्यायचे नाहीत. किंबहुना आम्हाला वाटले की आमचे अनुभव व शिकलेले धडे अधिक लोकांपर्यंत पोचवावेत, म्हणजे त्यातून त्यांनासुद्धा आपल्या गरजेच्या काळात फायदा होईल.

पुढचे एक पाउल म्हणजे मोठ्या कष्टाने व क्रमाक्रमाने आम्ही एकत्र केलेली माहितीची सामग्री आकर्षक व परिणामकारक रीतीने सादर करावी, म्हणून मी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स शिकून घेतले व ते वापरले.

आजकाल कविता पुन्हा लोकप्रिय होत आहेत आणि त्यांना व्यवस्थित चित्रांच्या साह्याने सादर केले जाते. अशा स्वरूपाच्या रचनेतून अँग्झायटीविषयी बोलणे सोपे होऊ शकते. या कारणासाठी मी कवितांचे सचित्र पुस्तक केले आहे.

तुम्हाला हे आवडेल आणि तुमच्या प्रिय व्यक्तींच्या कठीण काळात ते तुम्हाला उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे. माझे पुस्तक वाचल्याबद्दल धन्यवाद.

Read More...

Achievements

+6 more
View All