Share this book with your friends

Himalayatil Anwat Wata / हिमालयातील अनवट वाटा

Author Name: Adv. Leena Patil | Format: Paperback | Genre : Biographies & Autobiographies | Other Details

हिमालयातील अनवट वाटा’ हे पुस्तक म्हणजे लेखिकेने हिमालयात केलेल्या पाच पदभ्रमण मोहिमांमध्ये घेतलेल्या स्वानुभवांचे शब्दांकन आहे. लेखिकेने हिमाचल प्रदेश, गढवाल, कुमाऊ, पूर्व हिमालय अश्या प्रदेशांमध्ये दुर्गम हिमालयातील पदभ्रमणामध्ये तिला भावलेला निसर्ग, पहाडी भागातील जीवनमान, त्याच्याशी निगडीत काही माहितीपूर्ण गोष्टींचा उल्लेख सहज सुलभरीत्या कथेसारखा प्रत्येक पदभ्रमण मोहिमांचे प्रकरणामध्ये नमूद केलेला आहे. विशेषत: लेखिकेने निसर्गात होणारे अकल्पनीय बदल इतक्या सहजतेने आणि ओघवत्या भाषेत मांडलेत की, वाचकाला आपणही लेखिकेसोबत आहोत असेच वाटत राहते. हिमालयातील पदभ्रमणाच्या अनुभवातून लेखिकेला गवसलेलं जीवनाचे मर्म देखील ओघवत्या भाषेत लेखिकेने अधोरेखित केले आहे.   

ज्यांना पर्यटन, ट्रेकिंग ह्याची आवड आहे, तसेच हिमालयाची ओढ आहे, त्यांना हे अनुभव कथन वाचण्यास नक्की आवडेल.    

Read More...
Paperback
Paperback 275

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

अॅड. लीना पाटील

अॅड.लिना पाटील ह्या पनवेल नवी मुंबई येथे वास्तव्यास असून वकिली व्यवसायात २० वर्षे अग्रेसर आहेत. पदव्युत्तर महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी विज्ञान शाखेमध्ये प्राध्यापक म्हणून काही वर्षे कामकाज केले आहे. सन २००० मध्ये वकिलीची सनद घेऊन आज लिना नवी मुंबई स्थित ‘‘लिगल इंटीग्रिटी एलएलपी’’ लॅा फर्मच्या संस्थापक व व्यवस्थापकीय भागिदार आहेत. दिवाणी, कमर्शियल व कॉर्पोरेट विषयातील कामकाजामध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ‘पर्यायी वाद निराकरण’ करणाऱ्या संस्थांसोबत प्रमाणित मध्यस्थ (Accredited Mediator) म्हणून देखील लीना कार्यरत आहेत.  

लीना अनेक सामाजिक संस्थांशी निगडीत असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी सक्रिय असतात.  

वकिली व्यवसायात व्यस्त असतानाही त्यांनी ट्रेकिंग आणि पर्यटनाची आवड जोपासली आहे. लीना ह्यांना देश-विदेशामध्ये भटकंती करण्याचा छंद आहे. ‘हिमालयातील भटकंती’ हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून, त्यांनी आतापर्यंत आठ हिमालयीन पदभ्रमण मोहिमांमध्ये यशस्वी सहभाग घेतलेला आहे. तसेच सह्याद्रीमध्ये व स्कॉटलँडच्या वास्तव्यात तिथेही अनेक ट्रेक केलेले आहेत. युथ हॉस्टेलद्वारे आयोजित मोहीमांसाठी कॅम्प लिडर म्हणून देखील काम पाहीलेले आहे.

लीना ह्यांना वाचन, गद्य व पद्य लेखनामध्ये शालेय जीवनापासूनच विशेष रुची आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सदस्या म्हणून त्यांनी अनेक साहित्यिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतलेला आहे. हयाव्यतिरिक्त त्यांना फोटोग्राफी सतार वादन आणि संगीताची आवड आहे. 

 

Read More...

Achievements

+3 more
View All