आपल्या महाराष्ट्रभूमीस ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक वारशासहित संप्पन धार्मिक वारसाही लाभला आहे व या वारशाची साक्ष म्हणजे महाराष्ट्रात विपुल प्रमाणात असलेली देवस्थाने. महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात, गावात, शहरात, डोंगरदऱ्यांत, रानावनात असलेली ही देवस्थाने स्वतःचा एक वेगळा इतिहास व भूगोल जपून आहेत व या प्रत्येक देवस्थानामागे एक कथा आहे व ही कथा जाणून घ्यावयाची असल्यास या देवस्थानांच्या अंतरंगात शिरावे लागेल. महाराष्ट्रातील देवस्थाने या पुस्तकात महाराष्ट्रातील काही परिचित व अपरिचित देवस्थानांचा वेध घेण्यात आला असून या देवस्थानांचा इतिहास व भूगोल सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धार्मिक पर्यटनाची आवड असणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असायलाच हवे!