#National Writing Competition

Share this book with your friends

Money and Wealth / पैसा आणि श्रीमंती श्रीमंत जीवन जगण्याची कला / Art of Living Luxurious Life

Author Name: Deepa Vanjare | Format: Paperback | Genre : BODY, MIND & SPIRIT | Other Details

तुम्हालाही वाटतं का? - माझ्याकडे पैसे  टिकत नाही? पैसा खूप कष्ट केलाच की येतो? माझ्यापेक्षा कमी मेहनत करणाऱ्याचा  पगार वाढ होतोय?  मी जास्त अभ्यास केला तरीही मार्क्स कमी येत आहेत?  पैसा खूप मेहनतीने कष्टाने येतो माझ्याकडे?  कधी कधी तर येतच नाही आणि आला की लगेच संपतो.

असं काही किंवा तुम्ही तुमच्या सध्याच्या रिलेशनशिपमध्ये खुश नाही आहात किंवा कशाचा ना कशाचा तुम्हाला त्रास होतोय? 

किंवा सगळं छान चाललंय आयुष्यात सगळ आहे तरी एक समाधान नाहीये,  तुमच्या अशा छोट्या-मोठ्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हे पुस्तक वाचलं की मिळेल. तुम्ही शाळा किंवा कॉलेजमधील विद्यार्थी असाल किंवा नोकरी धंदा करणा करणारे असाल,  किंवा तुम्ही गृहीणी असाल तर तुमच्या रोजच्या छोट्या मोठ्या समस्या  आणि पैसा तुमच्याकडे सतत  भरपूर प्रमाणात कसा येईल  या सर्व प्रश्नांची उत्तरं  पुढील  धड्यांमध्ये मिळतील.

बऱ्याचदा काय होतं,  आकर्षणाचा सिद्धांत (law of attraction) आपल्याला माहितही असतो,  पण खूप जणांचा असा समज होतो की फक्त सकारात्मकच बोलायचं ना, एवढंच ना? 

खरं सांगायचं तर,  मलाही आधी असंच वाटायचं.मग मी काही युट्युब वर व्हिडिओज पाहिले पुस्तकं वाचलीत, तेव्हा मला ही नीट समजलं  आणि मी ते रोजच्या जीवनात वापरू लागले. मग मी माझे जीवन सहज सोप्प  आणि सर्वात महत्वाचं म्हणजे  जीवन आनंदी केले. आणि तुम्हीही माझ्यासारखं  असच सहज सोप्प आणि आनंदी आयुष्य deserve करता  आणि ते कसं शक्य होऊ शकतं हे ही तुम्हाला पुढील धड्यांमध्ये समजेल.

Read More...
Paperback
Paperback 399

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

दिपा वंजारे

दिपा वंजारे ही मुंबईची मुलगी.गेल्या 8 वर्षांपासून सॉफ्टवेअर  टेस्टर म्हणून काम करत होती.ती  खूप सुंदर कविता करते आणि  तिने  लघुकथा (शॉर्ट स्टोरीज) लिहिल्या  आहेत. तिला वाचनाची खूप आवड आहे. तिला आयुष्य एन्जॉय करायला खूप आवडतं. 

आकर्षणाचा सिद्धांतामुळे तिला स्वतःला खूप फायदा झाला. तिचं आयुष्य  खूप सुंदर,आनंदी झालं. 

खूप साऱ्या गोष्टी तिने  आकर्षणाचा सिद्धांत  वापरून मिळवल्या.  तिने आयफोन, नवीन जॉब, मालदीवची विदेश यात्रा, दैनंदिन जीवनात लहान सहान गोष्टी  मिळवल्या. हाच फायदा तिला लोकांनाही व्हावा  आणि लोकांनाही  आकर्षणाचा सिद्धांत वापरून त्यांच्या आयुष्य सुंदर  करता यावं. म्हणून तिने यूट्यूब चैनल देखील सुरू केलं.

"बाबा",   तिच्या आयुष्यातील खूप जवळची आणि महत्त्वाची व्यक्ती. बाबा कमी आणि मित्र जास्त.दररोज खूप सार्‍या गप्पा,एक घट्ट मैत्रीच नाते.बाबाच अचानक  देवा घरी जाणं खूप धक्कादायक होतं  तिच्यासाठी.  मग यातून बाहेर पडण्यासाठी, spiritual   सात्त्विक रस्ते( रेकी,  मेडिटेशन,   हीलींग  व सेल्फ लव  कोर्स)   तिच्या आयुष्यात आले. त्यातील एक "आकर्षणाचा सिद्धांत".  जे  तिला आधीपासून माहित होतं. जवळजवळ दहा वर्षे आधीपासून माहिती होतं.  पण सर्वांसारखा "आकर्षणाचा सिद्धांत" म्हणजे "फक्त सकारात्मक  बोलायचं एवढच आणि खूप सार्‍या टेकनिक", इतकंच कळलं होतं.  काहीतरी मिसिंग होतं. ते  तिला कळलं अंजना रितोरियाकडून. खूप महत्त्वाची गोष्ट कळली आणि त्याने  तीच पूर्ण जीवन  बदलले.   तिला बाबाच्या जाण्याच्या धक्क्यातून बाहेर  यायला मदत झाली आणि  ती तीचं जीवन  पुन्हा एकदा आनंदी करू शकली.असं काय होतं जे  तिला माहित नव्हतं?असं काय वेगळं केलं? असं कोणतं रहस्य तिला अंजना रितोरियाकडून  कळल? 

या पुस्तकातील गोष्टी  नियमितपणे दररोज वापरायला चालू करा. सुरुवातीला लहान लहान सवयी बदला आणि मोठी स्वप्न बघा.तुमच्या श्रीमंत आणि  सर्व सोयींनी युक्त जीवनात तुमचं स्वागत आहे.

Read More...