Share this book with your friends

Paisa Zala Motha / पैसा झाला मोठा टेक्निकल ॲनालिसिस आणि इन्ट्राडे ट्रेडिंग मार्गदर्शक

Author Name: Suraj Ramesh Pathade | Format: Paperback | Genre : Educational & Professional | Other Details

'पैसा झाला मोठा' हे एक टेक्निकल ॲनालिसिस आणि इन्ट्राडे ट्रेडिंग मार्गदर्शक आहे.
या पुस्तकात लेखकाने आपण स्वतः इन्ट्राडे ट्रेडिंगसाठी वापरत असलेल्या सर्व महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे.
हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस वापरून नक्कीच इन्ट्राडे ट्रेडिंगची यशस्वी सुरुवात करता येऊ शकते.
या पुस्तकात प्राइस ॲक्शन ट्रेडिंग, ट्रेण्ड ॲनालिसिस,  कॅन्डलस्टिक ॲनालिसिस, व्हॉल्युम ॲनालिसिस, सपोर्ट-रेझिस्टन्स, चार्ट पॅटर्न ॲनालिसिस अशा विविध साधनांची सविस्तर चर्चा केली आहे.
याशिवाय सेक्टर सिलेक्शन, स्टॉक सिलेक्शन, ट्रेड व्यवस्थापन, पैशांचे व्यवस्थापन, रिस्क-रिवॉर्ड अशा विविध गोष्टींची माहिती दिली आहे.
पुस्तकात संकल्पना समजावून सांगण्यासाठी अतिशय सोप्या मराठी भाषेचा आणि अनेक चार्टचा वापर केला आहे.

Read More...
Paperback
Paperback 499

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सुरज रमेश पठाडे

सुरज एक मेकॅनिकल इंजिनियर असून गेल्या तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करत आहे. सुरज पूर्णवेळ इन्ट्राडे ट्रेडर म्हणून काम करतो. त्याला आपल्या मायबोलीचा अभिमान असून शेअर मार्केटविषयी माहिती मराठी बांधवापर्यंत सोप्या मराठी भाषेत पोहोचवण्याचा तो प्रयत्न करतो आहे. कॅरम आणि बुद्धिबळ खेळणे हे सुरजचे छंद असून सुट्टीच्या दिवशी तो शेतीचे काम देखील करतो. सुरज ‘पैसा झाला मोठा’ नावाचा एक मराठी ब्लॉग देखील लिहितो आणि त्याचे ‘पैसा झाला मोठा’ नावाने एक अँड्रॉइड ॲप गुगल प्लेस्टोअर वर देखील उपलब्ध आहे. याशिवाय आपण पैसा झाला मोठा युट्युब चॅनेलला देखील भेट देऊ शकता.  

Read More...

Achievements

+1 more
View All