Share this book with your friends

The freezing of God / देवाचे गोठणे

Author Name: Sharad Yashwant Nawale | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

"देवाचे गोठणे" हे पुस्तक लिहिणारे, श्री. शरद यशवंत नवाळे यांचे मी प्रथम कौतुक करतो. मी पुस्तक वाचताना बऱ्याच गोष्टींचा या पुस्तकातून काही ना काही नवे जुने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. व त्याप्रमाणे  माहितीही दिली गेलेली आहे. तसे पहाता  देवाचे गोठणे हा अनेक वाडीनी तयार झालेला मोठा गाव आहे.त्यामुळे अनेक वाड्यांचा परिचयही वेगवेगळा असू शकतो. तेथील वाडीतील कोणी ना कोणी आपल्या परिचयाचा उपयुक्त असे काम केलेले असणारच यात शंका नाही. परंतु हे सारे अजमावणे व आणणे जिकरीचेच  आहे. तरी हा काही श्रमपूर्वक प्रयत्न श्री.शरद नवाळे यांनी केले आहेत, असे दिसते. प्राचीन ते अप्राचीन देवदेवींचे महात्म्य  मांडण्याचा चांगला प्रयत्न दिसत आहे. देव ,देवस्थाने यांची माहिती‌, सड्यावरील शिल्पे यांच्या उल्लेखामुळे आपल्याच बांधवांना आपल्या गावाचे महात्म्य कळण्यास मदतच होईल. तसेच आपल्या घराण्याच्या कुळाचे महत्त्वही कळेल. दिसा मासी काही लिहावे, चांगले ते जना सांगावे .हाच श्री शरद नवाळे यांचा प्रयत्न दिसून येत आहे.

Read More...
Paperback
Paperback 200

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

शरद यशवंत नवाळे

"देवाचे गोठणे" हे पुस्तक मी लिहायला घेतले तेव्हा माझ्या मनात खूप भितीचे दडपण आले होते. कारण देवाचे गोठणे गावावरती पुस्तक लिहिणे म्हणजे साध्यासुध्या माणसाचे काम नाही.  हे मला माहित होते. इतका मोठा गाव आणि त्यात लहान मोठ्या बारा सोळा वाडीचा इतिहास डोळ्यासमोर आणून लिहिणे म्हणजे फारच अवघड होते.आणि या देवाचे गोठणे गावाच्या मायभूमीत जन्म घेतलेल्या महान व्यक्ती महत्वाच्या थोर समाजसुधारक, समाजसेवक, आणि क्रांतिकारक, कवी, लेखक, साहित्यिक, अशा थोर नामवंताच्या भूमिमध्ये माझ्यासारख्या एका लहान माणसानी  या गावाबद्दल लिहावं खरच धाडस होत नव्हतं. जेव्हा वहीचे पान उघडून हातात पेन घेतला तेव्हा हात थरथर कापत होते.अंगाला घाम फुटला होता. काय लिहू या संभ्रमावस्थेत डोक्याला हात लावून थोडावेळ थांबून बसलो होतो. लिहिण्याची इच्छा मनाशी घट्ट होती  पण थरथरणाऱ्या हातामधला पेन पुढे सरकत नव्हता.

Read More...

Achievements

+2 more
View All