Share this book with your friends

Ekdum Bindhast (Marathi) / एकदम बिनधास्त (मराठी)

Author Name: Prajakta Gavhane | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

दोन कॉलेजवयीन मैत्रिणींच्या पुणे ते गोवा बाईक प्रवासाची थरारकथा आहे "एकदम बिनधास्त"! दुचाकीवरून एवढ्या दूरवर सहलीचा आनंद घेता यावा या सरळ साध्या विचाराने सुरु झालेल्या या प्रवासाने पुढे मात्र वेगळेच वळण घेतले. न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली त्यांना अटकेला सामोरे जावे लागले. तेव्हा स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तुरुंगातून पळून जाण्यापासून ते घोडेस्वारी करून खरा गुन्हेगार रंगेहात पकडून देईपर्यंत वाटेल ती जोखीम पत्करली या जोडगोळीने !

तरुणाईच्या ताज्या भाषेत लिहिलेली ही कथा अलगद तुम्हालाही तुमच्या फॅंटसीत नेऊन सोडेल. कदाचित त्यांनतर शेजारून झुईंग करत कट मारून बाईकवरून जाणारी बिनधास्त तरुणी दिसली की क्षण दोन क्षण तुम्हाला ती कथेतील नायिकाच वाटून जाईल. खरंच कधी प्रसंग ओढावला तर काळानुरूप स्पीडी झालेली ही मॉडर्न चंडी दुर्गा युवती त्या नायिकेइतकं धाडस दाखवू शकेल? गुंडांशी न डगमगता दोन हात करेल? जिथे शक्तीपेक्षा युक्तीने डोकं चालवायचंय तिथे बुद्धिजीवी डावपेचसुद्धा खेळेल?

मनाने तरुण असणाऱ्या कुणाही व्यक्तीला श्वास रोखून धरायला लावेल अशी ही रोमांचक कथा !!

Read More...
Paperback

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Paperback 300

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

प्राजक्ता गव्हाणे

प्राजक्ता गव्हाणे ओळखली जाते ती तिच्या लोकप्रिय ‘मराठी ब्रेथलेस’ या गीतासाठी. बेला शेंडे आणि डॉ. अमोल कोल्हेंनी सादर केलेलं हे गाणं मराठी संगीतप्रेमींसाठी पर्वणी ठरलं आणि पुढे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये देखील २०१३ साली नोंदवलं गेलं. मराठी चित्रपट परिवाराचा ‘चित्रपदार्पण पुरस्कार’, ‘बेस्ट अल्बम ऑफ द इयर’ असे पुरस्कार प्राजक्ता - तेजस चव्हाण – शंकर जांभळकर या त्रिकुटाने पटकावले. ‘पसायदान आरोग्याचे’, ‘कण्हेरीच्या फुला’, जगप्रसिद्ध कन्नड ‘सोजुगादा’चं मराठी रुपांतरीत ‘शुभ्रचंपा पुष्पे गुंफिते’, ‘वाटे बाकी काही नाही’ अशा अनेक उत्तम गीतांची गीतकार असलेली प्राजक्ता ही तितक्याच ताकदीने तिची पुस्तकं देखील सादर करते.

‘एकदम बिनधास्त’ (२०१४), जर्मनमधून मराठीत भाषांतरीत ‘इल्जं इन वंडरलॅन्ड’ (२०१८), ‘कोरोण्यकांड’ मराठी (२०२०), ‘कोरोण्यकांड’ हिन्दी (२०२१), ‘आय हार्नेक्स्ड मायसेल्फ’ (२०२१) ही प्राजक्ताने लिहिलेली  पुस्तके प्रसिद्ध आहेत. पुणेकर, फर्ग्युसोनियन असलेल्या प्राजक्ताने जर्मन भाषा आणि साहित्य विषयात पदवी आणि पदव्योत्तर शिक्षण घेतले असून लेखनाचे श्रेय ती तिच्या ज्ञान प्रबोधिनी शाळेला आणि साहित्यप्रेमी पालकांना देते. मराठी ही ज्ञानभाषा आहे, ती जपलीच पाहिजे; मातीशी नाळ घट्ट जोडली असताना लिहिणाऱ्याची नजर मात्र जागतिक साहित्याच्या क्षितीजावर स्थिर असली पाहिजे, अशी प्राजक्ताची धारणा आहे.

Read More...

Achievements

+2 more
View All