हिमालयातील अनवट वाटा’ हे पुस्तक म्हणजे लेखिकेने हिमालयात केलेल्या पाच पदभ्रमण मोहिमांमध्ये घेतलेल्या स्वानुभवांचे शब्दांकन आहे. लेखिकेने हिमाचल प्रदेश, गढवाल, कुमाऊ, पूर्व हिमालय अश्या प्रदेशांमध्ये दुर्गम हिमालयातील पदभ्रमणामध्ये तिला भावलेला निसर्ग, पहाडी भागातील जीवनमान, त्याच्याशी निगडीत काही माहितीपूर्ण गोष्टींचा उल्लेख सहज सुलभरीत्या कथेसारखा प्रत्येक पदभ्रमण मोहिमांचे प्रकरणामध्ये नमूद केलेला आहे. विशेषत: लेखिकेने निसर्गात होणारे अकल्पनीय बदल इतक्या सहजतेने आणि ओघवत्या भाषेत मांडलेत की, वाचकाला आपणही लेखिकेसोबत आहोत असेच वाटत राहते. हिमालयातील पदभ्रमणाच्या अनुभवातून लेखिकेला गवसलेलं जीवनाचे मर्म देखील ओघवत्या भाषेत लेखिकेने अधोरेखित केले आहे.
ज्यांना पर्यटन, ट्रेकिंग ह्याची आवड आहे, तसेच हिमालयाची ओढ आहे, त्यांना हे अनुभव कथन वाचण्यास नक्की आवडेल.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners