साक्षात मृत्यूशीच पैज ही कथा कोंढाणा किल्ल्याच्या परिसरात वसलेल्या कल्याण गावाची आहे. सुभानमंगळचा लढा ते तानाजींचं धारातीर्थी होणं ह्या कालखंडात फुलत जाणारी ही उत्कट प्रणयकथा वाचकांना एक वेगळाच अनुभव देऊन जाईल. शिवबांच्या हिंदवी स्वराज्याने धर्मांध व हिंदुद्वेषी प्रवृत्तींना खडसावलं होतंच, परंतु अधिक महत्वाचे म्हणजे त्यांच्यात भगव्या झेंड्याचे भय निर्माण केले. लेखकाने १६४८-१६७० ह्या मंतरलेल्या काळातील वास्तविक ईतिहास कोणताही विपर्यास न करता मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. समृद्ध भाषाशैलीमुळे हे पुस्तक अधिक वाचनीय झाले आहे.