आपल्या शिक्षणव्यवस्थेमध्ये जे काही कच्चे दुवे आहेत त्यांना हेरून ते बुजविण्याच्या दिशेने हे पुस्तक प्रभावीपणे काम करते. युनेस्कोच्या अनुसार कोणत्याही शिक्षणव्यवस्थेचे चार प्रमुख सूत्र असतात ती म्हणजे अधिकाधिक माहिती प्राप्त करणे, उद्दिष्टाची पूर्तता करणे, एक योग्य नागरिक घडवणे आणि इतरांशी वागताना माणुसकीचे जतन करणे, हा ता चार सूत्र. आपल्या विद्यमान शिक्षणव्यवस्थेतून माहिती-ज्ञान यांची प्राप्ती तर होते परंतु इतर तीन सूत्रांचा त्यात अभाव प्रकर्षाने दिसून येतो. शिक्षणाच्या चारही सूत्रांना सशक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न म्हणून हे पुस्तक आहे. या पुस्तकातील २४ सूत्रे आणि अखेरीस देण्यात आलेली नवनिर्माणशील प्रश्नावली, या दोन गोष्टी तुमचा दृष्टिकोन बदलण्याची क्षमता राखून आहेत. आज आपण नव्या भारताची निर्मिती आणि यश यांविषयी चर्चा करत असताना त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक अधिक झळाळून उठते. कोणत्याही विकसनशील देशाच्या सरकार आणि जनतेसाठी हे पुस्तक म्हणजे एक नवनिर्माणाची संजीवनी आहे. ही संजीवनी प्रत्येकाने प्राप्त केली तर देशाची समग्र जनता एक विकसित व्यक्ती म्हणून परिवर्तित होईल आणि त्याचा अंतिम फायदा देशाला होईल.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners