आपल्या सर्वांना दिवसात २४ तास म्हणजेच ८६४०० सेकंद मिळतात. परंतु काहींना हा वेळ पुरतच नाही तर काही यातून जास्तीतजास्त उपयुक्त गोष्टी करतात. वेळेचे व्यवस्थापन हा प्रत्येकाच्या गरजेचा आहे.वेळेचे व्यवस्थापन म्हणजे तुम्ही तुमचा रिकामा वेळ कसा योग्य पद्धतीने वापरता याचे नियोजन. तुमच्याकडे नियोजनच नसेल तर तुमच्याकडे मोकळा वेळही उरणार नाही.
आपण आपल्या जीवनात अंकगणितात काळ, काम, वेग ही उदाहरणे नेहमीच सोडवतो. परंतु त्यात असणारे वेळेच्या व्यवस्थापनेचे मूलभूत तत्त्व आपण मुलांपर्यंत पोहोचवत नाही व त्यामुळे ते आपल्या पुढील आयुष्यातसुद्धा समजायला खूप वेळ लागतो.व्यवस्थापन शास्त्र आणि व्यवस्थापन कलेच्या विस्तृत क्षेत्रात वेळेचा सदुपयोग या महत्त्वाच्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून 'वेळेचे यशस्वी व्यवस्थापन' हे पुस्तक अतिशय समंजस शैलीत लिहिले आहे. वेळेचे योग्य मूल्यमापन करून सदुपयोग करण्यासंबंधीचे अनेक उपाय या पुस्तकात दिले आहेत.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners