Share this book with your friends

Athavun hasuch yet / आठवून हसूच येतं

Author Name: Shanta Parvati | Format: Hardcover | Genre : Biographies & Autobiographies | Other Details

या पुस्तकात लेखिकेने कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात घालवलेले बालपण, गावातलं सरळ-साधं जीवन, कौटुंबिक प्रेम- जिव्हाळा, संस्कृती, परंपरा, सण या सगळ्या मधुर स्मृतींच रेखाटनं केले आहे. 
लेखिकेने आपल्या बालपणीच्या आठवणी लिहिताना, एका अनामिक कवीच्या/कवयित्रींच्या दोन ओळींचा आधार घेतला आहे. ती अनामिक कवी//कवयित्रीं म्हणते, “आठवून हसू येतं, की याच गोष्टीसाठी मी किती गदगदून रडले होते.” या दोन ओळींच्या निकषावर तिने बालपणीचे असे काही प्रसंग, किस्से निवडले, जे तिला प्रत्यक्षात अनुभवताना जड गेले होते पण कालांतराने आठवताना नकळत ओठावर हसू आणून गेले. 
यातून वर्तमानात कठीण वाटणारा प्रसंग भविष्यात एक हसू देणारी आठवण बनतो हेच लेखिकेला देखील सांगायचे आहे. 
तसेच यातील प्रत्येक आठवण गंमतीदार किस्स्यांच्या रूपात लिहिली आहे. जी वाचताना हसू तर येतंच पण एक निष्पाप बालमन, त्यांचं भावविश्व यांचं दर्शन घडतं. बालमानातले लहान-मोठे अनामिक भय, शंका, प्रश्न,भीतीचे क्षण, लहानपणीचे समज -गैरसमज, त्यातून आलेले अनुभव, अनुभवातून जगाची, परिसराची, माणसांची, प्राण्यांची होत जाणारी ओळख यांचं वर्णन अप्रतिम रीतीने केलेलं आहे . हे पुस्तक वाचकाला त्याच्या स्वतःच्या अनुभवांशी जोडत काही काळ स्वतःच्या बालपणात रमवत.

Read More...
Hardcover

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Hardcover 300

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

शांता पार्वती

शांता पार्वती या व्यवसायाने इंजिनिअर आहेत. त्यांना पटणी, इन्फोसिस आणि आयबीएम सारख्या नामांकित आयटी कंपन्यांमध्ये काम करण्याचा 15 वर्षापेक्षा जास्तचा अनुभव आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असल्यातरी त्यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड आहे जी कालांतराने लिखाणाला प्रवृत्त करणारी ठरली. त्या एक निसर्गप्रेमी आहेत. अध्यात्म, बागकाम आणि योगाभ्यास हे देखील त्यांचे आवडते विषय आहेत.

Read More...

Achievements