Share this book with your friends

cancer rugnachi sangharsha yatra / कॅन्सर रुग्णाची संघर्ष यात्रा आहार आणि जीवनशैलीतील विवेकी निर्णयांच्या माध्यमातून आजारावर मात करण्यासाठीची संशोधन-आधारित मार्गदर्शिका

Author Name: Dr. Sudha Bhide | Format: Paperback | Genre : Others | Other Details

कर्करोगाचे निदान आयुष्याला एका क्षणात धक्क्याने थांबवून टाकते. स्पष्टता आणि आत्मविश्वासव उपचार प्रवासातील प्रत्येक टप्प्याचा अर्थ उलगडून दाखवणारी ही मार्गदर्शिका आहे. प्रचलित उपचारपद्धती जसे की केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि इम्युनोथेरपी यांचे महत्त्व व जोखिम याबद्दल माहिती दिली आहे, ज्यामुळे डॉक्टरांशी संपर्क साधून शांतपणे, योग्य नियोजन करून, माहितीपूर्ण निर्णय घेता येतील. हे पुस्तक कर्करोगाच्या रुग्णांना आहार आणि जीवनशैलीवर आधारित भिडे प्रोटोकॉलची एक सहज व सोपी ओळख करून देते. वैद्यकीय उपचारांना पूरक, विज्ञानाधारित, नैसर्गिक आणि अत्यंत सोपी आहे. खर्चही अत्यल्प. अनुशासनाने पालन केल्यास ३–८ महिन्यांत दिसणारे सकारात्मक बदल—अनेक रुग्णांनी अनुभवलेले आहेत. आपण उपचारांचे निष्क्रिय भोगकर्ते न राहता आपल्या प्रवासातील जागरूक, सक्षम आणि सक्रिय सहभागी बनता. या पुस्तकातील प्रत्येक पान धैर्य, करुणा आणि कृतीक्षम उपायांनी ओतप्रोत भरलेले आहे—आपल्यासाठी आणि आपल्या प्रिय व्यक्तींसाठी. हे फक्त एक पुस्तक नाही—तर जीवनातील सर्वात कठीण प्रवासात आपला हात अलगदपणे धरून धैर्य देणारा एक सख्खा, सोबती आहे.

Read More...
Paperback

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Paperback 370

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

डॉ. सुधा भिडे

डॉ. सुधा भिडे या शास्त्रज्ञ व संशोधक असून त्यांनी भारतातील नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था (Government Institute of Science) येथे प्राणीशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून सेवा दिली आहे. निवृत्तीनंतर त्यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथील श्री नागपूर गुजराती मंडळ संचलित एस. एस. मणियार कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट येथे संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली असून त्या आजतागायत सतरा वर्षांपासून तेथे कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. हे प्रथम त्यांनीच एका संशोधन लेखात नोंदवले की मानवी भ्रूणामध्ये १५.५ ते २२ आठवड्यांच्या कालावधीत आतड्यांच्या रोगप्रतिकारक प्रणालीची सुरुवात व वेगवान विकास होतो, आणि याच काळात पेयरच्या  पॅचेस व अपेंडिक्स मधील लिम्फोसाइट्सच्या पृष्ठीय चिन्हकांचा (surface markers) संच विकसित होतो.

देशातील विविध भागांतील विविध प्रकारच्या कर्करोगग्रस्त रुग्ण, कर्करोगासाठीच्या आहार विषयक माहिती  बाबत त्यांचा सल्ला घेतात आणि अनेकांना त्याचा लाभ झाला आहे. विशेषतः स्तन कर्करोग, ल्युकेमिया, कोलन कर्करोग तसेच अन्न नलिकेतील (alimentary canal) कर्करोगा मध्ये अधिक लाभ झालेला दिसून आला आहे. रुग्णाच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंदी कुटुंब हेच त्यांना अपेक्षित असलेले पारितोषिक आहे, कारण त्यांचे मार्गदर्शन विनामूल्य असून ते सामाजिक कार्याचा एक भाग आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना प्रतिभा शक्ती, नागपूर यांच्याकडून ‘शक्ती प्रेरणा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी देशातील अनेक विद्यापीठांमध्ये आमंत्रित व्याख्याने दिली असून वृत्तपत्रांमध्येही त्यांच्याविषयी उल्लेख झाला आहे. खर्चिक कर्करोग उपचार परवडू न शकणाऱ्या कोट्यवधी गरिबांपर्यंत व श्रीमंत रुग्ण, ज्यांचा असा गैरसमज असतो की जितके जास्त पैसे खर्च करू, तितक्या लवकर आजार बरा होईल — या दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी त्यांच्या एका रुग्णाने दिलेले नाव “भिडे प्रोटोकॉल” हे श्रद्धेने पाळल्यास खूप फायदा होतो.  रुग्णांचे शारीरिक व मानसिक वेदना शक्य तितक्या कमी करणे आणि कर्करोगग्रस्त सर्व रुग्णांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग म्हणून त्यांची आहार विषयक पद्धत रूढ व्हावी, हेच त्यांचे ध्येय आहे.

Read More...

Achievements