Share this book with your friends

Aathavan / आठवण या आहेत आठवणी, माझ्या - तुमच्या आयुष्यात येणाऱ्या नि कायमचं घर करणाऱ्या

Author Name: Shirish Ambulgekar | Format: Paperback | Genre : Young Adult Fiction | Other Details

आयुष्याच्या वळणावर अनेक माणसं भेटतात, अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना आपण सामोरे जातो. ती माणसं नि प्रसंग आले तसे निघून जातात, पण त्यांच्या आठवणी मात्र कायम आपल्या जवळ उरतात आणि मग त्याच आठवणींच्या शिदोरीवर आपण जगत असतो!

आठवण: दैवाने मानवाला दिलेली एक अनमोल देणगी! चांगल्या आठवणी निसटून गेल्या तरी त्या आपल्याला पुन्हा पुन्हा हव्या हव्याशा वाटतात.. हा आहे अशाच आठवणींचा धांडोळा! मनामनाला जोडणारा आणि प्रत्येकाला तो माझाच आहे असा वाटणारा!

शिरीष अंबुलगेकर

Read More...
Paperback
Paperback 160

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

शिरीष अंबुलगेकर

शिरीष अंबुलगेकर यांचा जन्म मराठवाड्यातील (महाराष्ट्र राज्य) नांदेड या गावी १९७० साली, एका सामान्य कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असताना, त्यावर मात करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. सध्या ते मुंबई येथील “सन फार्मासुटिकल” या औषधाच्या नामांकित कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी आहेत.

शालेय जीवनापासूनच त्यांना साहित्याची आवड आहे. महाविद्यालीन काळापासूनच त्याचे विविध साहित्य अनेक वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित होत आले आहे. आकाशवाणीच्या विविध केंद्रामधून त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले आहेत. कथा, कविता आणि विविध विषयावरील लेख ते सातत्याने लिहीत असतात. “आठवण: माझा ब्लॉग, माझे विचार” या “ब्लॉग” च्या माध्यमातून त्यांचे साहित्य रसिकांपर्यंत पोचत असते (भेट द्या: shirishambulgekar.blogspot.com)

नौकरीच्या निमित्ताने देशातील विविध भागांना, तसेच सुमारे वीसहुन अधिक देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. या भेटीदरम्यान त्या-त्या देशातील प्रथा, परंपरा, संस्कृती, अभिरुची आणि विविध वैशिष्ट्यांचा ते वेध घेत असतात. त्यांना माणूस समजून घेणे फार आवडते; त्यामुळे भारतात आणि परदेशात त्यांचे असंख्य मित्र परिवार आहे.

Read More...

Achievements

+2 more
View All