Share this book with your friends

Antim Pag / अंतिम पग Life Begins Here! / अंतः अस्ति प्रारंभ:

Author Name: Amol Ramdas Pote | Format: Paperback | Genre : Reference & Study Guides | Other Details

हे पुस्तक  ‘अंतिम पग : अंतः अस्ति प्रारंभ :’ संरक्षण करिअर मार्गदर्शक पुस्तक आहे.
ज्यांना या महान राष्ट्रासाठी आपले योगदान द्यायचे आहे, परंतु माहितीच्या अभावामुळे क्षमता असूनही ते करू शकत नाहीत, अशा इच्छुकांच्या मनात जिद्द प्रज्वलित करणे हा या पुस्तकाचा एकमेव उद्देश आहे.त्यांना जागरूक करून विविध स्पर्धात्मक संरक्षण सेवा परीक्षा देण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे.
तरुण मुला-मुलींच्या मनामध्ये सैन्यदलात अधिकारी बनण्याची प्रेरणा जागृत करून,स्पर्धात्मक संरक्षण सेवा परीक्षेसंबंधीची सर्व माहिती त्यांना एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे हे पुस्तक त्यांच्या सैन्यदलातील करिअरच्या मार्गावर एखाद्या दीपस्तंभासारखे काम करीत आहे.
हे पुस्तक तुम्हाला संरक्षण सेवेत (सैन्य/नौदल/वायुसेना/भारतीय तटरक्षक) अधिकारी म्हणून प्रवेश करण्याच्या प्रत्येक संभाव्य संधीची माहिती करून देईल.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य जे त्याला एकमेव बनविते ते म्हणजे इयत्ता सातवी आणि दहावी पासूनच RIMC, डेहराडून आणि SPI, औरंगाबाद (संभाजीनगर)सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश कसा मिळवायचा, त्या साठी काय तयारी करावयास हवी याची इत्यंभूत माहिती देते. या संस्था त्यांनी देशाला बहाल केलेल्या सहा जनरल आणि भारतीय सैन्यदलातील सर्वोच्च अधिकारी याबाबतच्या त्यांच्या योगदानासाठी प्रसिद्ध आहेत.
तुम्ही कशाचा विचार करत आहात?तुमची स्वप्ने काय आहेत?तुम्हाला या करिअरकडून काय अपेक्षा आहेत? एक गणवेश, असाधारण सहकारी,बंदूक किंवा तुम्हाला जे काही व्हायचे आहे ते बनण्याची संधी?सैन्यदल ही अशी एकमेव संस्था आहे ज्या मध्ये सहभागी झाल्यास ती तुम्हाला तुमच्या आवडीचे काम करू देते.लष्कर तुम्हाला एक उत्तम व्यक्ती,एक नेता आणि निर्णय घेणारा बनवते.तुम्ही निवृत्त झाल्यानंतरही दुसर्या करिअरमध्ये काम करण्यासाठी तयार करते.जर तुम्ही संरक्षण दलात करिअर करण्याचा विचार करीत असाल तर या नंतर दुसरा कोणताच विचार करण्याची गरज नाही. हे भारतातील सर्वात रोमांचक कार्यस्थळ आहे,जिथे जग म्हणजेच तुमचे कार्यालय असेल. 

Read More...
Paperback
Paperback 299

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

अमोल रामदास पोटे

या पुस्तकाचे लेखक अमोल रामदास पोटे हे आता मुंबई येथे उद्योजक म्हणून कार्यरत असले; तरी अद्यापही ते सैन्यामध्ये अधिकारी होऊन आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसारखेच आहेत . 
 सिंधू आणि रामदास पोटे यांचे अपत्य असलेले लेखक हे मूळचे औरंगाबादचे रहिवासी आहेत. अहमदनगर येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूल या सैनिकी शाळेत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रवेश घेतला.  त्यांनी आपले एम. फार्मसी. पुणे विद्यापीठातून पूर्ण केले आहे आणि आता आपल्या कुटुंबासोबत ते मुंबई येथे वास्तव्यास आहेत .
सैनिकी स्कूल मध्ये झालेल्या प्रशिक्षणामुळे लेखकाच्या मनामध्ये लहानपणापासूनच ' स्व ' पेक्षा सेवेला महत्व देण्याचे बीज रुजले. लेखकामधे सुरुवातीपासूनच नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्याची जिद्द तसेच  सैन्यात अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न प्रज्वलित झाले. या स्वप्नाचा पाठपुरावा करीत असताना त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यांच्या संघर्षाच्या दिवसांत ते मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात राहिले. कदाचित त्यामुळेच त्यांचे या दोन शेजाऱ्यांवर विशेष प्रेम आहे. 
सैन्यामध्ये अधिकारी बनण्यासाठी लेखकाने CDSE परीक्षेची तयारी केली आणि SSB मुलाखतीसाठी निवडले गेले पण SSB मुलाखतीचा टप्पा पार करण्यात त्यांना यश मिळू शकले नाही. 
त्यामुळेच लेखकाला या गोष्टीची कायम खंत वाटते कि त्यांनी जर बालपणापासूनच सैन्यात जाण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली असती तर आज कदाचित ते एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जाण्या ऐवजी एक सैन्य अधिकारी बनले असते.
'अंतिम पग ' हे पुस्तक लेखकाच्या मनातील याच खेदाचे एक प्रेरणादायी रूपांतर आहे; जे आज अनेक तरुण तरुणींना सैन्यात अधिकारी बनण्यासाठी फक्त प्रेरितच करीत नाही तर त्या संदर्भातील सर्व आवश्यक माहिती एकत्रित त्यांच्या पर्यंत पोहचवण्याचे मोलाचे कार्य करीत आहे.

 

Read More...

Achievements

+9 more
View All