Share this book with your friends

Bhutya - : Part -1 | / -भुत्या .....भाग - १ | The Wonder Of Devil

Author Name: Yogesh Vasant Borse | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

मित्रांनो नमस्कार , मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचे BORSE GROUP'S SUCCESS MISSION मध्ये हार्दिक स्वागत करतो . प्रस्तुत आहे, एक हृदयाला हादरे देणारी आणि मन विचलित करणारी मराठी भयकथा ! 

     ' The Wonder Of Devil –  भुत्या : भाग १ ! ' मित्रांनो , ही कथा पूर्णतः काल्पनिक असली, तरी मानवी जीवनातील घडामोडींवर आधारित आहे. आपण आपल्या आयुष्यातील बहुतांशी निर्णय भाव विवश होऊन  , भावनेच्या भरात घेतो. पण त्यामुळे आपलं आयुष्य कसं प्रभावित होतं , हेच या भयकथेत वाचायला मिळेल .   

       अतिशय उत्कंठावर्धक आणि भयचकित करणारी ही भयकथा कमजोर मनाच्या आणि कमजोर मानसिकतेच्या व्यक्तींसाठी नक्कीच नाही ! तुम्हाला घाबरण्याची आवड असेल , आणि तुम्ही भीती पचवू शकत असाल, तरच ही कथा वाचावी ! कारण बऱ्याच ठिकाणी भीती आपल्यावर प्रभाव टाकू शकते आणि काही अनाकलनीय,  गूढ घटना मन विचलित करू शकतात ! तूर्तास तेवढी काळजी घ्या ! तुम्हाला ही कथा नक्की आवडेल, आणि माझ्या इतर कथांप्रमाणेच तुम्ही या कथेलाही भरभरून प्रेम द्याल , प्रतिसाद द्याल, याची खात्री बाळगतो ! आणि आपले आभार मानतो ! 

आपला,

लेखक - : योगेश वसंत बोरसे  

Read More...
Paperback
Paperback 279

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

योगेश वसंत बोरसे

 प्रिय वाचक हो, मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION  मध्ये हार्दिक स्वागत करतो. 

   मित्रांनो, मी ही  तूमच्या सारखाच !  एक वाचक ! वय वर्ष ४८ 

लहानपणापासून वाचनाची आवड होती. बरीच पुस्तके वाचली गेली  होती. त्या वाचनाने प्रभावित होऊन लिखाणाची आवड निर्माण झाली ! आपले अनुभव, आपल्या कल्पना आपण शब्दबद्ध करू शकतो  का ?अशी कल्पना डोक्यात आली ! आणि लिखाण सुरु केलं ! 

    बघता बघता १०० + स्टोरीज कधी लिहून झाल्या, समजलं ही नाही ! त्यातील काही लघुकथा वेबसाईट वर तर काही दीर्घकथा E - BOOKच्या माध्यमाने प्रकाशित केल्या. 

 अशीच ही एक रहस्यमय भयकथा - उत्कंठा वाढवणारी , भयचकित करणारी, तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे ! 

आपला कृपाभिलाषी,

योगेश वसंत बोरसे   

Read More...

Achievements