10 Years of Celebrating Indie Authors

Share this book with your friends

Dalimbache Dane / डाळिंबाचे दाणे Marathi Rahasyamay Bhaykatha

Author Name: Yogesh Vasant Borse | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

 रात्री ९ ते १२ चा  शो बघून तो सिनेमा थिएटर मधून बाहेर पडला . एकटाच ! अर्थात गर्दी होतीच ,पण एवढ्या गर्दीत ही तो एकटाच होता ! त्याला आई शिवाय कुणी नव्हतं ! आणि आईला ही याच्याशिवाय कुणी नव्हतं ! .....

त्याचं लक्ष समोर गेलं . समोर एक ब्रिज होता आणि ब्रिजवर कुणी होतं ! तसा  ब्रिज जुना होता ! म्हणजे आता वापरात नव्हता ! त्याने निरखून पाहिलं . ती व्यक्ती ब्रिजच्या कठड्यावर चढण्याचा प्रयत्न करत होती !
याची ट्यूब पेटली . ' आत्महत्या ?'.....

       चंदूने दार बंद केलं ! दार बंद करता करता त्याची नजर पुन्हा बंगल्याच्या वरील भागात गेली. एक धूसर आकृती खिडकीतून डोकावत होती. नजर चंदूच्या दिशेने होती. चंदूच्या अंगावर सर्रकन काटा आला. त्याने पटकन दार बंद केलं. 
       सिक्युरिटी असताना हि बंगल्यात कुणी कसं शिरू शकतं ? त्यालाच विचारावं लागेल. चंदूने पटकन हात पाय धुतले. नवीन कपडे घातले. शूज घातले. शर्ट इन केलं ! स्वतःमधील बदल तो बघत होता. आपण इतके व्यवस्थित दिसू शकतो ! याची त्याला कल्पना ही नव्हती. त्याने मनोमन साहेबांचे आभार मानले. आणि त्याला आठवण आली. साहेबांनी बोलावलंय ते ! तो भांग पाडून, हातात घड्याळ घालून पटकन बाहेर  पडला.......

Read More...
Paperback
Paperback 160

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

योगेश वसंत बोरसे

मित्रानो नमस्कार , 
    मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचं बोरसे ग्रुप सक्सेस मिशन मध्ये हार्दिक स्वागत करतो . 
   मित्रानो ,मी सुद्धा तुमच्या सारखाच एक वाचक ! वय वर्ष ४७ + 
आतापर्यंत अनेक पुस्तके वाचली गेली . आणि वाचता वाचता एक दिवस मनाने कौल दिला! योगेश ?तू का लिहीत नाहीस ? म्हणून लिहायला सुरुवात केली . आणि बघता बघता शंभराहून अधिक कथा लिहून झाल्या ते मला ही  समजलं नाही ! मुलं मोठी झाली ,त्यांनी लिखाण बघितलं ,त्यांनाही आवडलं आणि त्यांनीच मला वेब साईट बनवून दिली . लघुकथा ब्लॉग्स च्या रूपात टाकल्या . दीर्घ कथा E -BOOK म्हणून टाकल्या . त्यातीलच ही पहिली कथा  ! डाळिंबाचे दाणे ! 
   नाव जरी सौम्य असलं तरी ही काल्पनिक भयकथा आहे ! आणि हा पहिला भाग आहे ! ज्यांना भयकथेची आवड आहे , सवय आहे त्यांनीच वाचावी ,कारण काळजाचा ठोका चुकवणारे अनेक प्रसंग यात आहेत ! 
तेव्हा पूर्ण कथेचा आनंद घ्या आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा !

तुमचा अभिलाषी :- लेखक - श्री . योगेश वसंत बोरसे .      
          

Read More...

Achievements