Share this book with your friends

kalachi Garaj / काळाची गरज

Author Name: Rohini Gabhale | Format: Paperback | Genre : Humor | Other Details

सध्या धाकधुकीच्या जीवनात करिअर करता करता लग्न हा विषय कुठेतरी दुर्लक्षित होऊ लागला आहे. तिशीनंतर आई वडिलांना आपल्या मुलगा, मुलगी त्यांच लग्न कधी होईल? याची चिंता लागते. 

     करिअर ओरिएन्टेड मुलगी जेव्हा पत्नी ,सुन होते तेव्हा तिची तारांबळ कुठेतरी मी कथेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नवरा साथ देणारा असेल तर कोणत्याही बिकट परिस्थितीत ती स्त्री मात करु शकते असेही काही प्रसंग तुम्हाला इथे वाचायला मिळेल. 

   संसार म्हंटल की आवडीनिवडी, अडी अडचणी आल्याच पण त्या सावरत कसा मार्ग निघू शकतो? हे नवरा , बायको दोघांनाही स्वतः कळलं पाहिजे. करिअर सांभाळता सांभाळता कुठेतरी आपल्या माणसांंना तर आपण दुरावत नाही ना ? ही जाणीव ही झाली पाहिजे. 

जेव्हा जॉब करणारी मुलगी सुन म्हणून घरात येते तेव्हा तिलाही आधाराची ,समजून घेण्याची गरज असते. 

    जसं प्रत्येक पुरुषाच्या प्रगतीमागे स्त्रीचा वाटा असतो तसं प्रत्येक स्त्रीच्या प्रगतीमागे पुरुषाचा वाटा असेल तर किती छान ना? 

आताच्या जगातील वास्तवाशी सांगड घालणारी कथा म्हणजे "काळाची गरज"

Read More...
Paperback
Paperback 315

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

रोहिणी गभाले

मी एक गृहिणी असून सामाजिक,स्त्रीविशेष लिखाण ही माझी आवड आहे. जुलै २०२१ पासून मी लिखाणाला सुरुवात केली. नाही कळले कधी ही माझी सगळयात पहिली कथा. ह्या कथेने मला लेखक म्हणून नाव मिळवून दिले. अंकुर हि कथा प्रतिलिपी सुपरलेखक १ मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेली कथा आहे.  जास्तीत जास्त सकारात्मक तसेच सध्यस्थितीवर आधारित लिखाण करायचा माझा प्रयत्न असतो. काळाची गरज हे  माझे पाचव पुस्तक आहे त्यातून नक्कीच तुम्हाला छान वाचायला मिळेल हे मात्र मी खात्रीपूर्वक सांगते.  

Read More...

Achievements

+1 more
View All