Share this book with your friends

LOKSAMVADAPURVI PRERAK - MIC SHAPPATH CORRECT / लोकसंवादापुर्वी प्रेरक - माइकशप्पथ करेक्ट

Author Name: Prasad Prakash Tupache | Format: Paperback | Genre : Educational & Professional | Other Details

“ माइकशप्पथ करेक्ट “ हा एक प्रयत्न आहे लोकसंवादापुर्वी कराव्या लागणार्या पुर्वतयारीचा. कोणताही लोकसंवाद हा विविध परिस्थितींच्या अनुषंगाने करावयाचा एक नित्यजागर असतो . अशा संवादातुन आपल्या परिजनांना, अनुयायांना तसेच विरोधी विचारसरणीच्या आपल्या भोवतालच्या व्यक्तींना आपण आपलं त्या परिस्थितीविषयीचं आकलन , अभ्यास, निर्णय आणि प्रबंधन यांची ओळख करून देतो . एका जाग्रुत लोकधारेमधे मतमतांच्या प्रागैतिक प्रवाहातुन विचारांची सुस्पष्ट देवाण घेवाण होते आणि त्यातुन कित्येक वैचारिक मतभेद वा हेवेदावे संपुष्टात येतात. याचसोबत सामाजिक संवेदना, एकात्मता आणि समसमान संधींचे निर्हेतुक हस्तांतरण होते आणि त्यातुन समाजमनाची शाश्वत व्रुद्धी होऊ लागते. लोकसंवादाची कौशल्ये अंगी बाणणं हे आजच्या तंत्रज्ञानप्रिय जगात अत्याधिक महत्वाचं झालं आहे कारण एक प्रतिनिधी म्हणुन आपल्याला बर्याच वेळा लोकसंवादातुनच आपली भुमिका जाहीर करावी लागते आणि काही प्रश्नोत्तरांच्या सत्राला आत्मविश्वासानं सामोरं जावं लागतं. हे पुस्तक आणि त्यातले २२१ उत्तम उतारे अशा प्रसंगांसाठी नक्कीच प्रभावी ठरतील असा आम्हाला विश्वास आहे .

Read More...
Paperback
Paperback 400

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

प्रसाद प्रकाश तुपचे

श्री. प्रसाद प्रकाश तुपचे हे अभियंता असुन त्यांनी आपल्या कार्यकाळात मिळालेल्या व्यावसायिक जबाबदार्या पार पाडताना  लोकसंवादाचं  कौशल्य अवगत केलं आहे . या कौशल्याच्या माध्यमातुन त्यांनी समाजातल्या वेगवेगळ्या व्यक्तींशी सुसंवाद साधुन आपल्या मतांच आदान-प्रदान केलं आहे . या पुस्तकातुन त्यातलीच काही कौशल्य आपल्यासमोर ठेवली आहेत. आशा करतो , ती ऊपयुक्त ठरतील .    

Read More...

Achievements