Share this book with your friends

Majha Sangharsh / माझा संघर्ष Bhaag - 1 / भाग-१

Author Name: Sandeep Bharat Raminwar | Format: Paperback | Genre : Biographies & Autobiographies | Other Details

थोडंसं सांगायचं म्हटलं तर मी खूप छोटा प्रयत्न केला आहे व थोडक्यात अर्थपूर्ण गोष्टी मांडायचा प्रयत्न केला आहे. मी हे पुस्तक कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या पुस्तकाद्वारे कुणाचही मन दुखावले जाऊ नये अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आयुष्य प्रत्येकाचच एक गोष्ट आहे त्यामुळे ही पण एक छोटीशी गोष्टच आहे ज्याला आपण पहिला भाग म्हणू व ईश्वराची इच्छा असेल तर तो मला भाग-२ पूर्ण करण्याचंही भाग्य देईल व त्याच्या चरणी प्रार्थना करतो त्यासाठी. कळत नकळत मी कुणाचा उल्लेख करण्यास विसरलो असेन तर त्यांची क्षमा मागतो. मी स्वतःला एक साधारण व्यक्ती मानतो- समजतो त्यामुळे माझ्या हातून काही लिखाणाच्या चुका झाल्या असतील तर त्याबद्दलही मनापासून क्षमा मागतो. माझ्या ह्या लिखाणात थोडंस इंग्रजी पण आलंय व मला वाटतंय २०-२१ व्या शतकात असं माझ्यासारख्या प्रत्येकालाच हे होत असेल कारण रोजच्या वापरात इंग्रजी शब्दांचा खूप वापर होतोय. त्याबद्दल सर्व मराठी वाचकांची क्षमा मागतो. हे पुस्तक पूर्ण करण्यात माझ्या प्रयत्नांपेक्षाही माझे मित्र, शुभचिंतक - श्री. माणिक नाडगौडा व त्यांची सहकारी तन्वी देसाई यांच्या प्रयत्नांना मी जास्त महत्व देतो कारण (त्याचं) पुस्तकी रूपांतर करण्यात त्यांनी खूप वेळ दिला व मराठी लिखाण पूर्ण करून त्याच्या प्रिंटींगचं पण कार्य त्यांनीच पूर्ण केलेलं आहे. पुनःश्च त्यांचे मनापासून आभार. माझ्यासारख्या नास्तिकाला ईश्वरी मार्ग दाखवण्याबाबत माझे अध्यात्मिक गुरु श्री. वैभव आफळे यांच्या चरणी नमस्कार व सच्चिदानंद परात्पर गुरु परमपूज्य आठवले यांच्या चरणी साष्टांग नमस्कार. माझे सर्वस्व व धर्मसंस्थेचे संस्थापक ‘श्री कृष्ण’ यांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग नमस्कार व त्यांनीच मला हे बळ दिलं, त्यांनीच माझ्याकडून हे कार्य करवून घेतलं याबद्दल त्या विधात्याच्या चरणी नमन - जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्ता करविता तोच आहे.

Read More...
Paperback

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

संदिप भारत रामीणवार

सर्वप्रथम मी माझ्या जन्मदात्या आईवडिलांना नमस्कार करून त्यांच्या चरणी आणि त्या विधात्याच्या चरणी माझं हे छोटसं लिखाण, जे पूर्ण सत्य आहे ते अर्पण करतो. माझे प्रेरणास्थान माझे वडील, माझी आई, माझी ताई व गुरु, माझा मित्र व सखा प्रकाश या सर्वाना वंदन करतो व माझ्या आयुष्यातल्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद करतो. माझ्या आयुष्यातल्या ह्या प्रवासात जे जे व्यक्ती माझ्यासह व माझ्या विरोधात होते त्या सर्वांचे पण धन्यवाद करतो. माझं सर्वस्व असलेल्या माझ्या दोन्ही मुली कु. प्रतीती, कु. साराक्षी तसेच माझी पत्नी सौ. प्रतिमा ह्यांनी मला सतत प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद करतो.

Read More...

Achievements