You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal"झुंजार, मी मानाजीला शोधायला अवश्य येईन, पण लक्षात ठेव, या मोहिमेवरून परत येणं जवळ जवळ अशक्यच," हिम्मतने झुंजारला मोहिमेतील धोका अधोरेखित करीत सांगितले.
मृत्यूगुहेतील खजिना हा हिम्मतने सांगितलेला एक विलक्षण चित्तथरारक अनुभव आहे, ज्यात तो झुंजारच्या हरवलेल्या भावाला शोधण्यासाठी मृत्युगुहेत जातो, आणि त्यांचा हा विलक्षण प्रवास, गूढ आणि अनाकलनीय ठिकाणांवरून, दऱ्याखोऱ्यातून, चेटकिणी आणि जंगली माणसांमधून, हिंस्त्र श्वापदां मधून होतो... मग ती मृत्यूगुहा असो वा चंड पर्वत, सैतानरक्षित लाल-भिंत असो वा तीन पुतळ्यांची—दगडी देवांच्या अधिपत्याखाली येणारी वेताळ दरी. प्रश्न हा आहे कि इतक्या भयानक ठिकाणांवरून मार्गक्रमण करतांना किंवा निर्बीड जंगलातून व मरणाच्या उष्ण वाळवंटातून अन्न-पाण्याविना प्रवास करताना अशा मोहिमेचा शेवट आनंदी होण्याची अपेक्षा करता येईल का?
हा प्रवास वाचकालाही शोध मोहिमेवर जाणाऱ्या टोळक्यातला एक भाग करून ह्या रोमांचकारी प्रवासाची प्रत्यक्ष अनुभूती देतो. रोमांचक तितकाच थरारक! हिम्मत उगीच नाही सांगत, संकटं अशी गुंफली होती कि जणू एखाद्या चित्रपटाची शृंखलाच. प्रत्येक कडी दुसरीला अडकवून ठेवणारी... प्रत्येक आवर्तन, मागच्या पेक्षा कठीण व पुढच्या पेक्षा सोपे… आम्हांला आमच्या चुकीसाठी माफ न करणारं… ज्या क्षणी त्याचा अनादर होईल, त्या क्षणी मृत्यूशी गाठ घालून देणारं... घटना अशा घडत होत्या जशी एखादी सिद्धी तिच्या परमोच्च बिंदूकडे हळू हळू सरकावी... ती सिद्धी तारक की मारक हे काळच ठरवणार होता.
ही चित्र-कथा लहान मुलांना नक्कीच एक नवीन साहस-विश्व अनुभवण्यास मदत करेल.
काय तर मग, होताय या रोमहर्षक सफरीचा एक भाग? चला तर मग मृत्यूगुहेतील खजिन्याच्या शोधात.
श्रीहर्ष सोनार
चार्टर्ड अकाउंटंट, श्रीहर्ष सोनारचे कुटुंब कलाक्षेत्रात खोलवर पाय रोवून उभे आहे. त्याचे वडील, दशरथ सोनार, हे एक प्रतिष्ठित चित्रकार असून त्यांनी अनेक पुरस्कारप्राप्त नाटकांचे व लघु-कथांचे लेखनही केलेले आहे.
लहानपणापासूनच वाचनाची व शाळेत मनोरंजक गोष्टी सांगण्याची आवड असल्याने, अखेरीस लेखकाने आपल्या वीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीला तात्पुरता निरोप देऊन, आपल्या अंत:करणाच्या सर्वात जवळ असलेले काम करायचे ठरविले. म्हणूनच तो स्वत:ला 'पुनरुत्थित' कथाकार म्हणतो. इंग्रजीत श्रीहर्षची दोन पुस्तकं भारतात व लंडनमध्ये प्रसिद्ध झाल्यावर, त्याने बालवाचकांसाठी ही कथा-चित्रांची मेजवानी आणली आहे. लेखक लवकरच छोट्या मुलांकरिता तीन सचित्र कादंबर्या व तरुण वर्गासाठी चार प्रौढ कथा प्रकाशित करणार असून, त्याची एक गूढ कथा लवकरच युरोप खंडातील पांच देशांत एकाच वेळी प्रसिद्ध होणार आहे.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.