Share this book with your friends

Prerana 365 / प्रेरणा ३६५

Author Name: Chandrakant Page | Format: Paperback | Genre : Educational & Professional | Other Details

अलीकडे वाचन संस्कृती कमी कमी होत चालल्याचे दिसते. त्यामुळे मोठमोठाले धर्मग्रंथ, कथा-कादंबऱ्या, लेख वाचण्याकडे फारसा कुणाचा कल  असत नाही. आवड असली तरी वाचायला पुरेसा वेळ उपलब्ध होत नाही ही वस्तुस्थिती. 

ब्रह्मचैतन्य सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज यांची रोजनिशी सुमारे १२ वर्षांपूर्वी मला भेट म्हणून मिळाली, आणि त्यातली मला 'एका पानावर एक संदेश' ही संकल्पना खूपच आवडली. कोणतेही पान उघडावे आणि त्यादिवशी आवश्यक असलेलंच काहीतरी मार्गदर्शन मिळावं असे खूपदा अनुभवही आले. 

त्यावरून प्रेरणा घेऊन मी १२ वर्षांपूर्वी मी *स्वगत* या शीर्षकाची ३६५  लघुलेखांची माला लिहिण्याचा संकल्प केला. रोज एक लघुलेख लिहायचा आणि सर्वांना पाठवायचा. लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला. त्यामुळे आजवर  हे ३६५ लघुलेख किमान दहा वेळा तरी सर्क्यूलेट झाले असतील. 

या सर्व ३६५ लघुलेखांचा एकत्रित आविष्कार म्हणजे हे पुस्तक *प्रेरणा ३६५*

फक्त २० सेकंदात एक लघु लेख वाचून होईल. एका लेखाची दुसऱ्या लेखाशी काही सलगता जाणीवपूर्वक न ठेवल्याने कोणतेही पान उघडावे आणि वाचावे. त्यातून तुम्हाला काही ना काही मौल्यवान संदेश, दिशा, प्रेरणा मिळेलच ही मला खात्री आहे. 

या सर्व लेखांचे ऑडिओज पण यूट्यूब वर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी त्याचाही लाभ घ्यायला हरकत नाही. 

या लघुलेख निर्मितीचं मूळ प्रेरणास्थान ब्रह्मचैतन्य सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज यांच्या पाठोपाठ माझे सर्व गुरुतुल्य शिक्षक, कुटुंबीय, मित्रपरिवार, ग्राहक, चाहते, हितचिंतक या सर्वांचा मी मन:पूर्वक ऋणी आहे.

चंद्रकांत पागे

चीफ कौन्सेलर,

मिशन ऑनलाईन कौन्सेलिंग 

9967311224

Read More...
Paperback

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

चंद्रकांत पागे

चंद्रकांत पागे

चीफ कौन्सेलर : मिशन ऑनलाईन कौन्सेलिंग

# मानवी नातेसंबंध विकास समुपदेशक

   गेल्या अकरा वर्षात ११००० पर्सनल कौन्सेलिंग्ज केली, 

   १६८ घटस्फोट वाचवले, ८९ आत्महत्या वाचवल्या. 

# लेखक : फक्त आईपप्पांसाठी, दुसरी बाजू

# मोटिव्हेशनल स्टेज शो परफॉर्मर : 

   येऊ दे परीक्षा आम्ही तयार आहोत

   यश आणूया खेचून

# कौन्सेलिंग स्टेज शो परफॉर्मर : 

   मुलांच्या समस्या पालकत्वाला आव्हान

कार्य गुणगौरव :

# सानेगुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार (२००५) सन्मानित

# राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार (२००६) सन्मानित 

# महाराष्ट्र गुणीजन रत्न पुरस्कार (२००७) सन्मानित  

Read More...

Achievements

+4 more
View All