Share this book with your friends

rhymes for kids / बडबडगीते आणि बालकथा इटुकल्या पिटुकल्या दोस्तांसाठी

Author Name: Manmohinee | Format: Paperback | Genre : Children & Young Adult | Other Details

वर्षानुवर्ष आपण आपल्या घरातील लहान मुलांना तीच ती बडबडगीते शिकवत आहोत. बडबडगीते हल्ली कोणी फारशी लिहीतही नाहीत आणि एकंदरीतच अशा पुस्तकांना फारशी मागणीही बाजारपेठेतून नसल्याची तक्रार ऐकीवात येते.

लहान मुलांमुलींकरिता नवीन बडबडगीते लिहीण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि नोशन प्रेसच्या माध्यमातून स्वतःच हे पुस्तक प्रकाशित करण्याचा उपद्व्यापही मी केला आहे. कदाचित माझा हा प्रयत्न तुम्हा वाचकांना आवडेल अशी आशा आहे. सगळीच बडबडगीते जमली आहेत असा माझा कोणताच दावा नाही, पण बरीचशी बडबडगीते नक्कीच तुम्हाला आवडतील असा मला विश्वास आहे. 

जरूर वाचा आणि पुस्तक आवडल्यास मला जरूर कळवा. 

संपर्क - mohineeg@gmail.com

धन्यवाद

- मोहिनी

Read More...
Paperback
Paperback 500

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

मनमोहिनी

मोहिनी घारपुरे - देशमुख

शिक्षण - बीएसस्सी केमिस्ट्री (न्यूक्लिअर), ADHRM, MA in MASS COM AND JOURNALISM, संगीत विशारद

लेखन व पत्रकारिता क्षेत्रात गेल्या अकरा वर्षांपासून कार्यरत. 

दिव्य मराठी नाशिक आणि अमरावती येथे युवा व महिला विषयक पत्रकारिता. तरूण भारत नागपूर येथे उपसंपादिका ते पुरवणी संपादिका पदापर्यंतचा प्रवास. सोशल मीडियावर सायबर रक्षक पेजच्या माध्यमातून जनजागृतीपर लेखन. नोकरीतून बाहेर पडल्यावर 'तुमचं आमचं सेम असतं' नावाने ब्लॉग सुरू करून ब्लॉगर म्हणून नवी ओळख. नोशन प्रेसतर्फे 'ओंजळभर कविता' हे पुस्तक प्रकाशित. दरम्यान एका नामांकित ई-लर्निंग कंपनीमध्ये सोशल मीडिया मार्केटर पदावरून कार्य. नुक्कड फेसबुक पेजवरून कथालेखन. नुक्कडतर्फे घेतलेल्या बालकथा स्पर्धेत द्वितीय पुरस्कार. 

संगीत विशारद. गाण्याची अतिशय मनापासून आवड व प्रेम. 

कला, साहित्य व विज्ञान क्षेत्राची विशेष आवड. त्याचबरोबर पर्यावरण व सामाजिक कार्यात आवडीने वेळोवेळी विविध संस्थांच्या माध्यमातून सक्रीय सहभाग. 

Read More...

Achievements