Share this book with your friends

Sankshipt Peshwai / संक्षिप्त पेशवाई

Author Name: Mrs Meena Godkhindi | Format: Paperback | Genre : History & Politics | Other Details

ही सारी पेशवाई म्हणजे मराठी मनाचे मुक्तचिंतन आहे. पेशवाई म्हणजे यशापयशाचे दाहक सत्य आहे. पेशवाई म्हणजे पराक्रमाचा, शौर्याचा आविष्कार आहे. पेशवाई म्हणजे कलासक्त रसिकतेचा मधुर झंकार आहे. पेशवाईला फुटीरतेचा, राजद्रोहाचा जळजळीत शाप आहे. पण अटकेपार झेंडा फडकावणारी पेशवाई समस्त मराठी मनाचा अभिमानबिंदू आहे. भाऊबंदकी, बेबंदशाही, तोतयाचे बंड, घाशीराम कोतवाल इ. इ. नाटकांना जन्म देणारी पेशवाई बहुप्रसवा आहे. पेशवाई म्हणजे रमा-माधवाच्या प्रेमाची शांत दीपज्योत आहे तर पेशवाई म्हणजे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाची झंझावती तेजोशलाका आहे. पेशवाईला नारायणराव यांच्या खूनाचा लाल टिळा लागला आहे आणि याच पेशवाईच्या शेवटच्या बाजीरावाने इंग्रजांना युनियन जॅक शनिवारवाड्यावर डौलाने फडकताना पाहिला आणि ही अवघी पेशवाई शापित झाली.

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सौ. मीना गोडखिंडी

लेखन व पत्रकारितेसाठी अनेक मान्यवर संस्थांचे, बँकांचे, एकूण ६० सत्कार व पुरस्कार प्राप्त. १२८ ललित लेख दर्जेदार मासिके व वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहेत. विविध दर्जेदार मासिके, पाक्षिके व वृत्तपत्रातून विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिंच्या २३५२ मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत.

Read More...

Achievements

+9 more
View All