Share this book with your friends

Spruha / स्पृहा लघुकथा संग्रह

Author Name: Rohini Gabhale | Format: Paperback | Genre : Self-Help | Other Details

"स्पृहा" ह्या पुस्तकात वेगवेगळ्या आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या गोष्टींना अनुभवून लिहिलेल्या कथा आहेत. जास्त स्त्रीविशेष कथा आहेत त्यात स्पृहा ही जरा खास आहे. आजकाल सगळयाच गृहिणी स्पृहाच्याच परिस्थितीतून जाताना दिसतात. बाळंतपणानंतर तिच्या शरिरात झालेले बदल मस्तीत तर कधी तिरस्काराने घेतले जातात तसं पाहायला गेल तर जाड व्हायला कुणाला आवडेल ना? त्यांना गरज असते समजून घेण्याची तसेच सोबतीची. अशाच वेगवेगळ्या छटा असलेल्या कथा तुम्हाला ह्या पुस्तकात वाचायला मिळतील.

Read More...
Paperback
Paperback 175

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

रोहिणी गभाले

नमस्कार ,मी रोहिणी गभाले. आर्ट्स मध्ये माझं ग्रेज्युएशन झालंय तसेच सात वर्ष मी एका कॉलेज इन्स्टिट्यूट मध्ये अँज अ एच. आर.जॉब केला आहे. लग्नानंतर मी भिमाशंकरला स्थायिक झाली. तिथे मिस्टरांना हॉटेलमध्ये जमेल तशी मी मदत करते. लॉकडाऊनमध्ये सर्व बंद असताना सहज सूचलेलं मी शब्दात मांडल आणि प्रतिलिपीला लिखाणाला सुरुवात केली. हळूहळू प्रतिसाद मिळत गेला आणि लिखाण वाढत गेलं. आजुबाजुला घडणाऱ्या घटना कधीकधी आपण सरळ बोलू शकत नाही किवां त्याबद्दल मतही मांडू शकत नाही त्यावेळी लेखणी मात्र बोलू लागते. कधी स्वतःच लिखाण पुस्तक स्वरुपात वाचायला मिळेल ही कल्पना केली नसताना आज माझं दुसरं पुस्तक प्रकाशित होत आहे. 

मी साधारण गृहिणी असून छंद म्हणून मी लिखाण करते त्यात ही सामाजिक कथा मला लिहायला जास्त आवडतात. लिखाण प्रगल्भ व्हावं ह्यासाठी माझा प्रयत्न सुरु आहे. लिखाणासोबत कुकिंग,गाणी ऐकणे हे माझे छंद आहेत.

नाही कळले कधी ही कथामालिका लिहिताना जास्तीत जास्त मी कौटुंबिक कथा कशी होईल ह्याकडे कल दिला आणि त्यात मला यश ही मिळाल. ते फक्त माझ्या वाचक वर्गामुळे मला अनुभवायला मिळाल. 

Read More...

Achievements

+1 more
View All