Share this book with your friends

The Dharavi Model / दि धारावी मॉडेल

Author Name: Kiran Dighavkar | Format: Paperback | Genre : Biographies & Autobiographies | Other Details

आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोविड-१९ या विषाणूने शिरकाव केला. मुंबईतच नव्हे तर देशभरात होऊ घातलेल्या या महामारीच्या विस्फोटाला प्राथमिक अवस्थेतच निपटून काढण्यासाठी केलेले प्रयत्न व त्याला मिळालेले यश याची, ही रोमांचक कथा वाचकाला खिळवून टाकणारी आहे!

;दि धारावी मॉडेल;, ही कोविड-१९ च्या महामारीचा प्रसार थांबवण्यासाठी आणि उच्चाटनासाठी योजलेल्या उपाययोजनांची सनसनाटी व मन विदीर्ण करणारी लेखमाला आहे. यामुळे एकीकडे अनेक जीव वाचले तर दुसरीकडे लढतांना अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले....... अखिल विश्वाने गौरवलेली आणि स्वीकारलेली ही प्रणाली शब्दबध्द करुन पुस्तक रुपात सादर करताना अत्यानंद होत आहे!

Read More...
Paperback
Paperback 380

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

किरण दिघावकर

श्री.किरण दिघावकर यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील सटाणा हे आहे. ते मुंबईला आपली कार्यभूमी मानतात. मुंबईच्या विकासासाठी ते निरंतर कार्यरत आहेत. श्री.दिघावकर हे संप्रति जी/उत्तर विभागात सहाय्यक म.न.पा. आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते ए विभागाचे सहाय्यक म.न.पा. आयुक्त होते. कुलाबा, कफ परेड, चर्चगेट, सी.एस.टी. अशी उच्चभ्रू वस्ती त्यांच्याच अखत्यारित येत होती. त्याच्याही आधी ते एम/पूर्व विभागात कार्यरत असताना, गलिच्छ वस्तीच्या प्रशासनाचाही त्यांना दांडगा अनुभव आहे. म्हणूनच त्यांना मुंबईच्या सर्वच स्तरांची, समस्यांची जाणीव आहे.
धारावीतील महामारीचा बिमोड करणे हे त्यांच्यासाठी आव्हानात्मक काम होते. याच काळातील त्यांचा हा प्रवास नवनवीन गोष्टी शिकण्याचा, जाणण्याचा व अभ्यास करण्याचा होता. धारावी मॉडेल म्हणून नामकरण झालेला हा प्रवास पुस्तक रुपात सादर करण्यात येत आहे.

Read More...

Achievements

+10 more
View All