You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palआजच्या जगात परवलीचे शब्द ठरलेल्या व्यवस्थापन, प्रशासन, जागतिकीकरण, आर्थिक धोरणं यांमधील अनेक मूलतत्वांची प्राचीन, पौराणिक, ऐतिहासिक घटनांशी व दंतकथांशी सुयोग्य सांगड घालता येते. व्यवस्थापनाची बहुतांश सगळीच तत्त्वं पुरातनकाळात भारतात वापरली जात होती.
प्रभू रामचंद्र रावण वधानंतर अयोध्येत परतले तेव्हा राज्याची घडी व्यवस्थित बसवण्यास त्यांनी न्यायदेवतेस अदृश्य रूपात वजनकाट्यावर बसवून व्यापारीवर्गास तराजूत योग्य ते द्रव्य करापोटी भरायला सांगितलं आणि त्यातूनच साकारलेली रामराज्याची कल्पना अर्थशास्त्राच्या पब्लिक फायनान्सच्या थिअरीमध्ये सापडते.
राजा भरत स्वतःला तीन मुलगे असूनही त्यांना दूर करून राष्ट्रहितासाठी भारद्वाज ऋषींच्या भूमन्यू नावाच्या मुलाला भारतवर्षाच्या सम्राट पदावर बसवू शकला. एकलव्य तर स्वयंप्रगती व उद्दिष्टं ठेऊन काम करणं या तत्वप्रणालीचा प्रणेताच म्हणायला हवा. अजूनही जनमानसावर स्वतःची अफाट प्रतिमा टिकवून ठेवलेल्या श्रीकृष्ण चरित्राचा अभ्यासही कायमच मार्गदर्शक ठरावा असा आहे.
प्राचीन कथांतून शिकायला मिळतो तत्कालीन लोकांनी केलेला बुद्धीचा सुयोग्य वापर, युक्तिवाद व परिस्थितीजन्य प्रश्नांवर यशस्वीपणे केलेली मात.
व्यवस्थापनाची व्याख्या देणाऱ्या मेरी पार्कर फॉलेटला तरी काय माहिती असणार की, हजारो वर्षांपूर्वीच व्यवस्थापनाची सारी सूत्रं भारतात समर्थपणे वापरली गेली होती.
डॉ. विनय भोळे यांनी संशोधनपूर्वक घातलेली प्राचीन भारतीय कथा आणि त्यातील आधुनिक व्यवस्थापन यांची सांगड वाचकांना विस्मयकारी जगात नेऊन सोडते.
डॉ. विनय भोळे
डॉ. विनय भोळे गेली एकतीस वर्षे कॉमर्स आणि मॅनेजमेंट विषयांचे प्राध्यापक असून मॉडेल कॉलेज, डोंबिवली येथे प्राचार्य पदावर कार्यरत होते. त्यांनी आजवर कॉमर्स, अकाउंट्स, लॉ, सायकॉलॉजी, मॅनेजमेंट, क्रिमिनॉलॉजी, इकॉनॉमिक्स अशा अनेक विषयांत सुमारे पंचवीस पदव्या आणि पदविका संपादन केल्या आहेत. लहानपणापासून आजवर अव्याहतपणे त्यांनी स्वतःचे शिक्षण सुरु ठेवले आहे.
त्यांचे पन्नास पेक्षा जास्त शोधनिबंध अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल्स मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
मुंबई विद्यापीठात ते पी. एचडी. गाईड आहेत. नॅक (नॅशनल अॅसेसमेंट अँड अॅक्रेडीटेशन कौंसिल), बंगलोर येथे नॅक अॅसेसर या पदावर कार्यरत असून तसेच युनिव्हर्सिटी ग्रॅण्ट कमिशनच्या विद्यापीठ पीअर टीमवर त्यांची दोनदा नियुक्ती झाली आहे. ऑटोनॉमी म्हणजेच स्वायत्तता मिळवण्याच्या प्रक्रियेत त्यांनी आजवर अनेक कॉलेजेसला मार्गदर्शन केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ अशा वृत्तपत्रांतून तसेच विविध मासिकांतून त्यांनी अनेक विषयांवर लेखन केलं आहे.
आजवर अनेक सामाजिक संस्थांमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे.
डॉ. विनय भोळे यांना आजवर महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्सचा संशोधन विषयक पुरस्कार, विद्यार्थी सहायक संस्था, गिरगांव यांचा ‘विद्याभूषण पुरस्कार’, डोंबिवलीकर प्रतिष्ठानचा ‘आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार’, दिल्ली येथील सामाजिक संस्थेमार्फत ‘आर्च ऑफ एक्सलन्स पुरस्कार’, इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग तर्फे ‘विद्या विभूषण पुरस्कार, नागरी सत्कार समिती, डोंबिवलीतर्फे ‘चैतन्य पुरस्कार’, कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे ‘कोंकण शिक्षण रत्न पुरस्कार’, वालिया सेंटर फॉर एक्सलन्स, मुंबई, तर्फे एक्सेप्शनल टीचर अवॉर्ड, परशुराम सेवा संघ, पुणे तर्फे ‘शिक्षणरत्न पुरस्कार’, रोटरी तर्फे ‘इन्स्पिरेशनल डायरेक्टर अवॉर्ड’ प्रदान करण्यात आले आहेत.
पोलीस खात्याच्या विविध सामाजिक समित्यांवर त्यांनी गेली तेवीस वर्षे काम केलं आहे. डोंबिवली जिमखाना, जनरल एजुकेशन सोसायटी, दादर, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट, नागरी सत्कार न्यास अशा अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. ब्राह्मण सभा, डोंबिवली या डोंबिवलीतील सर्वात जुन्या सामाजिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. ते ज्योतिष, वास्तुशास्त्र विषयांचे अभ्यासक आहेत.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या भूमिका स्पष्टपणे मांडणारं त्यांचं ‘पालकनीती’ नावाचं पुस्तक नुकतंच मोरया प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलं आहे.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.