Share this book with your friends

Apani Kahani.... / अपनी कहानी.... एका काश्मीरी युवकाची खिळवून ठेवणारी प्रेमकहाणी !

Author Name: Neelima Deshpande | Format: Paperback | Genre : Young Adult Fiction | Other Details

पहिल्यांदाच काश्मीर बघण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाचा बशीर नावाच्या एका काश्मिरी ड्रायव्हर सोबत हसत खेळत सुरू केलेला प्रवास तिसऱ्या दिवशी पहेलगामहून परत येतांना एका वेगळ्या वळणावर येऊन थांबतो. 

अनेक भावनिक, सामाजिक, राजकीय कंगोरे असलेली ही कथा मुळात एक प्रेमकथा आहे. 

'अपनी कहानी'...हे हिंदी नाव मराठी कादंबरीला दिले गेले ते मुख्य पात्र बशीर यामुळे! त्यानेच ह्या गाण्याने सुरुवात करीत कथानकाला अगदी सुरुवातीलाच वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले. 

वेगवेगळ्या काळातील तात्कालिक, सामाजिक अथवा राजकीय परिस्थितीशी बशीरच्या परिवाराने व इतर काश्मिरी बांधवांनी केलेला सामना अतिशय संयत शब्दात फक्त कथानकाच्या गरजेपुरता वर्णन केलेला असल्याने आपणही आस्वाद घेत कथा सलग वाचत राहतो. 

प्रेमकथा असली तरी प्रत्येक भागात कथा जितकी रोमांचक तितकीच उत्कंठावर्धक भासते. अनेक प्रसंगी व कादंबरीचा शेवट होतो तेंव्हाही ही कथा आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करते हेच या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.

Read More...
Paperback

Ratings & Reviews

0 out of 5 (0 ratings) | Write a review
Write your review for this book
Paperback 300

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

नीलिमा देशपांडे

नीलिमा देशपांडे २५ वर्षांहून अधिक काळ व्यवसायाने एच आर आणि ट्रेनर आहेत. त्यांना शैक्षणिक सामग्री आणि कौशल्य आधारित कार्यक्रम विकसित करण्याचा अनुभव आहे. त्या एक अनुवादक तसेच ब्लॉगर आहेत. 

नीलिमा देशपांडे यांचे इतर प्रकाशित साहित्य:
1. नव्या वाटांवर
2. 'ती' सध्या काय करते?
3. सप्तपदी की तप्तपदी?
4. काव्यरंग
5. Dealing with Memory
6. Abacus
7. Little star
8. Love birds or Angry birds?
9. अगर तूम साथ हो!
10. डेटिंग, नाती आणि Confusion!

Read More...

Achievements

+8 more
View All