You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palपावसाचा आवाज
पाऊस आणि पावसाच्या आवाजाचं मला लहानपणापासून प्रचंड कुतुहल मिश्रित आकर्षण आहे. आमच्या गावी पाऊस सुरू झाला की मी अभ्यास करणं बंद करून पावसाची गंमत पहात - पावसाचा आवाज ऐकत घराच्या दारात उभा रहायचो. (आजही पावसाचं स्वागत मी असंच काहीसं करत असतो.) पाऊस पडत असतानाचा, पावसाच्या वेळी वाहणार्या वार्याचा, आकाशात चमकणार्या विजा आणि गरजणार्या ढगांच्या समग्र आवाजाला मी ‘आदिम तालाचं संगीत’ म्हणतो. या शीर्षकाची एकच कविता या संग्रहात असली तरी एकूण कवितांत संखेने पावसाच्या कविताच जास्त दिसून येतील.
पाऊस कोणताही असो, म्हणजे पावसाळ्यातला मोसमी असो, झडीचा असो, अवकाळी असो की मान्सूनपूर्व असो, मला तो आकर्षून घेतो. पावसांतून आदिम तालाचं संगीत मला ऐकू येत राहतं...
‘आदिम तालनं संगीत’ या कवितासंग्रहात ही सर्व अहिराणी भाषेतली कविता. या कवितेचा मुख्य घटक म्हणजे भाषा आणि भाषेतली परिभाषा. या कवितेतली परिभाषा वाचून ही नक्की कोणती भाषा आहे, असा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो.
भाषा कोणतीही असो त्या भाषेत आविष्कृत होताना कवीची स्वत:ची एक भाषा तयार होत जाते. म्हणून व्यक्तीपरत्वे भाषा बदलते असं म्हटलं तर वावगं होणार नाही. म्हणून केवळ भाषा, परिभाषा वा विशिष्ट बोली समजून घेतली की कविता समजली, असं होत नाही. कोणतीही कविता अजून एक नवीच परिभाषा ठरते.
हे विवेचन म्हणजे या कवितासंग्रहातील समग्र कवितेची निर्मिती प्रक्रिया नाही, आस्वाद नाही आणि मर्मग्रहण, समीक्षणही नाही. फक्त प्रास्ताविक. संग्रहातील पहिल्या आवृत्तीतल्या एकशे त्रेपन्न आणि आता (२००१ ते २०२० या काळात लिहिलेल्या) ब्यायशी कविता अशा एकूण दोनशे पस्तीस कविता या आवृत्तीत समाविष्ट आहेत.
धन्यवाद.
- डॉ. सुधीर देवरे
डॉ. सुधीर राजाराम देवरे
डॉ. सुधीर रा. देवरे यांचा अल्प परिचय:
विद्यावाचस्पति - एम. ए. पीएच. डी.
भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक.
साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक.
अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन.
ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक.
सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती.
महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कार.
ग्रंथ लेखन:
1. डंख व्यालेलं अवकाश, मराठी कविता संग्रह, 26 जानेवारी 1999, लाखे प्रकाशन, नागपूर.
2. आदिम तालनं संगीत, अहिराणी कविता संग्रह, भाषा प्रकाशन, बडोदा. जुलै 2000, तुका म्हणे पुरस्कार, २०००)
3. कला आणि संस्कृती : एक समन्वय, संदर्भ ग्रंथ, जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर. मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, 2002 - 2003
4. पंख गळून गेले तरी, आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर. स्मिता पाटील पुरस्कार.
5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ -संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई.
6. अहिराणीच्या निमित्ताने : भाषा, 8 एप्रिल 2014, पद्मगंधा प्रकाशन, पुणे. महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कार.
7. अहिराणी लोकसंस्कृती, संदर्भ ग्रंथ, 8 एप्रिल 2014, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.
8. अहिराणी गोत, अहिराणी दर्शन, 7 मार्च 2014, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.
9. अहिराणी वट्टा, अहिराणी कथा, 7 मार्च 2014, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.
10. माणूस जेव्हा देव होतो, चरित्र, 4 जानेवारी 2014, अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा.
11. सहज उडत राहिलो, आत्मकथन, 1 ऑक्टोबर 2016, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई.
12. सांस्कृतिक भारत, राज्यनिहाय लेख, 15 डिसेंबर 2017, मेनका प्रकाशन, पुणे.
13. माणसं मरायची रांग, कथासंग्रह, 1 जानेवारी 2019, विजय प्रकाशन, नागपूर.
14. मी गोष्टीत मावत नाही, कादंबरी, 25 फेब्रुवारी 2019, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.
15. टिंब, कादंबरी, 15 ऑगष्ट 2019, सहित प्रकाशन, गोवा.
16. आस्वाद : भावलेल्या कवितांचा, समीक्षा, मार्च 2020, वर्णमुद्रा प्रकाशन, शेगाव.
17. ब्लॉगच्या जाळ्यातून जग, लेखसंग्रह, 25 सप्टेंबर 2020, दिलीपराज प्रकाशन, पुणे.
18. सायको, कादंबरी, फेब्रुवारी 2021, तेजश्री प्रकाशन, इचलकरंजी.
19. भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण, महाराष्ट्र, 17 ऑगष्ट 2013, पद्मगंधा प्रकाशन, पुणे. यात प्रत्यक्ष सहभाग आणि पृष्ठ क्रमांक 68 ते 81 वरील अहिराणी भाषा वरील दीर्घ लेख. आणि इतर आगामी.
Blog link:<
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.