10 Years of Celebrating Indie Authors

Share this book with your friends

Aavhan / आव्हान

Author Name: Sudhir Muley | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

चंदन , रंग्या आणि सौमित्र हे शाली गावात रहाणारे तिघं मित्र. मात्र स्वतःच्या अंगभूत गुणानं चंदन शाली गावचा सरपंच बनतो आणि गावाचा विकास करतो. त्यामुळे गाव त्याला मान द्यायला लागतं. चंदनला डोक्यावर घेतं. सौमित्रला हे बघवत नाही. मात्र स्वतःची कुवत कमी असल्यामुळे कर्तृत्त्वानं चंदनच्या पुढे आपल्याला जाता येणार नाही हे तो ओळखून असतो. 

कंटूक नावाचं गाव हे गुंडांचं गाव म्हणूनच ओळखलं जात असतं. तिथे रहाणारा प्रत्येक माणूस हा पैसा आणि बाई या दोन गोष्टींसाठी वाटेल त्या कामाची सुपारी घ्यायला तयार असतो. तिथल्या सोगिरा नावाच्या गुंडाला शालीमधून एक सुपारी मिळते. ती स्वीकारून सोगिरा शालीत येतो आणि शालीसमोर एक आव्हान बनून ठाकतो.

सोगिराला कोण सुपारी देतं? सोगिरा शालीत आल्यानंतर काय करतो? सोगिराचं आव्हान कोण स्वीकारतं?

सतत उत्कंठा वाढवणारं कथानक असलेली थरारक कादंबरी. सुधीर मुळे यांच्या फौलाद या सामच्या दारा बुलंदच्या पवलांवर चालणा-या मानसपुत्राच्या कथामालिकांमधील एक कथा. 

Read More...
Paperback
Paperback 350

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सुधीर मुळे

सुधीर मुळे हे मुख्यत: कादंबरीकार आहेत. परंतु ते कथाही लिहितात. रहस्यकथा आणि विनोदाच्या माध्यमातून सामाजिक, कौटुंबिक प्रश्नांचा वेध हे त्यांच्या लेखनाचे सूत्र आहे.सामाजिक,कौटुंबिक समस्या चटकदार पध्दतीनं मांडून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. विनोदी कथा लिहिण्यातही त्यांचा हातखंडा आहे. गंभीर स्वरूपाचे सदरलेखनही ते करत असतात. रहस्यकथा, गूढकथा आणि भयकथा हाही त्यांच्या लेखनाचा भाग आहे. त्यांच्या आजवर तेरा कादंब-या आणि तीन विनोदी कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी दोन कादंब-यांची तिसरी आवृत्ती अल्पावधीतच संपली आहे. ते व्यंगचित्रकारदेखील आहेत.

अनेक दैनिके, साप्ताहिके आणि दिवाळी अंक यांतून त्यांचे लेखन प्रसिध्द झाले आहे. दै. पुढारीच्या ’बहार’ या रविवारपुरवणीत त्यांनी दर रविवारी सलग साडेतीन वर्षे ’लवंगी फटाके’ हे विनोदी सदर लिहिले.  आकाशवाणी सोलापूर आणि अहमदनगर येथून त्यांचे कथाकथन प्रसारित झाले आहे. ’स्टोरीटेल’ वर त्यांची ऑडिओ कथा उपलब्ध आहे. त्यांच्या ’ह्युमन गॅरेज’ या विनोदी कथेचे एकांकिकेत रूपांतर झाले आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे.

Read More...

Achievements