Share this book with your friends

Cheers to 21 partner / चिअर्स टू 21 पार्टनर

Author Name: Kamalakar Sanjay Kale | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

आणि समोरचा कॅमेरा चालु न करून कित्येक दिवस लोटले असावे. स्वतःचा द्वेष वाटावा एवढी पण विद्रुप मुळीच नाही आपण. पण हल्ली स्वतः दोष देता देता स्वतः ल पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय किती भयानक परिस्थिती. दुःखाच्या जननीला माणूस सहजी सहज लवकर सोडत नाही. माझ्यामते हातावर झेलनाऱ्या माणसात तुम्ही अभिमानाने, स्वाभिमानाने जगू शकता पण कधी समाधानी नाही राहु शकत. समाधान कुठे असेल तर ते फक्त आपल्या माणसांच्या पायात रेंगळण्यात आहे. तिथं आपल्याला सुख वाटत, समाधान मिळत, अति विचारांना कुठेतरी पूर्णविराम नकळत दिला जातो. आपल्याला समोरचा काय समजतो हे त्यांच्या विचारांवर अवलंबून आहे पण आपल्या मनातील निखळ भावना आपल्याला माहिती आहे म्हणून आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना कमी माहिती आहोत. सगळ्यांसमोर स्पष्ट मला पण बोलता येत पण काही मन जपण्याचा नादात आपण शांत असतो. वर्तमान जगण्याच्या नादात आपण भविष्याचा पण विचार केला पाहिजे. आता वेळेचा विरुंगळा म्हणुन प्रेमाची नाटक केली जातात त्यांना पुढे भविष्य आहे का.? हे आपण पाहिलं पाहिजे. आपण या गोष्टी करताना कोणाला फसवतोय हे एकदा स्वतः ला विचारलं पाहिजे आपण आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला पाहिजे फक्त आजचा विचार न करता दुर दृष्टिकोन ठेवला पाहिजे. 

Read More...
Paperback

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

कमलाकर संजय काळे

एक शब्द विचार करायला भाग पाडतो. डोक्यातील हजारों स्वप्नांना एका क्षणात पुर्ण विराम द्यावा लागतो. तो शब्द म्हणजे सौंदर्य. सौंदर्य हा शब्द परिपुर्ण आहे. सौंदर्य ज्याला लाभलं तो आयुष्य आनंदी, सुखी सहज जगू शकतो. हल्ली शारीरिक सौंदर्य सर्वात अग्रेसर आहेत. मनाचे सौंदर्य, विचाराचे सौंदर्य आणि एखाद्याबद्दल असलेली मनातील भावना या गोष्टी पुस्तकात किंवा एखाद्या लेखात सुंदर शोभतात. एका चौकटीत त्यांना सजवल जात आणि वाचुन मनाचे समाधान व्यक्त केले जाते आता आपण असे वागणार नाही पण इतरांनी या प्रकारे वागावे अस आपल सहज मत तयार होत. शारीरिक सौंदर्य हे कालबाह्य होणारे आहे आपण हे वाक्य खुप ठिकाणी वाचले असावे. पण त्याचा विचार कितपत केला जातो. आपण का स्वतःची स्वप्न मारायची. जेव्हा आपली जाणीव भासेल तेव्हा मात्र आपली उणीव नक्की असेल. मन निर्मळ असेल तर त्रास होईल अगदीं खर आहे पण तो तुला सहन करता येईल आणि तु चुकल्याचा तुला पश्चाताप होणार नाही. कारण तुझे विचार शुद्ध आहे. पण जाणीव नसेल तर काय उपयोग. प्रयत्न आपल्या हातात आसतात. थकल्यावर पुर्ण विराम द्यायचा की नवीन मार्ग शोधायचा याचा विचार एकांतात बसुन करायचा. मनाला योग्य वाटेल त्याच्या विरोधात निर्णय घ्यायचा. आपण आपली आवड सहाजिक सांगु शकतो. पण निवडलेली प्रत्येक गोष्ट ही आवडेलच किंवा आपल्या आवडीच्या चौकटीत आपल्याला योग्य बसवता येईल का.? तर ते शक्य नाही. मी माझे पाय जमिनीवर ठेवायला हवी मध्यम वर्गीय आहे तर स्वप्न त्या प्रकारची पहावी. यात दुमत नाही, एखाद्याच्या स्वप्नासाठी आपल आयुष्य खर्ची घालवता यावं. आवडीचा व्यक्ती जर जोडीदार मिळाला तर छान आहे पण त्यापेक्षा मला पसंद करणाऱ्या व्यक्तीचा जोडीदार होण मला अधिक आवडेल. जेव्हा उजव्या हातात जोडीदाराचा डावा हात राहील तेव्हा डाव्या खांद्यावर भार न टाकता जोडीदाराचा पुर्ण भार मी माझ्या उजव्या खांद्यावर घ्यायला सज्ज असेल. तु सौंदर्य निवड मी स्वभाव निवडेल. तु आकर्षक निवड मी संस्कार निवडेल. जिथे संस्कार आहे तो मनाने सुंदर असेल आणि मनाने सुंदर असणारा मिळाला तर माणसाचं जीवन सार्थक झालं अस बोलुन मी पुर्ण विराम द्यायला संकोच करणार नाही.

Read More...

Achievements

+1 more
View All