Share this book with your friends

In the Search of Peacock / इन द सर्च ऑफ पीकॉक

Author Name: Bhavesh | Format: Hardcover | Genre : Literature & Fiction | Other Details

आपल्या भवताली घडणारे सारेच बदल - 'बदलत जाणारे, नाहीसे होणारे वा नव्याने येऊ घातलेले रंग' हे काही आपल्याला भावतीलच असेही नसते, आपण त्यांच्या प्रेमात पडू असेहि नसते किंवा आपण त्यांचा दुस्वास करू हेहि नसते. कदाचित आपल्याला ते बदल भावूही शकतात. नवसृजनाची आस तर मनाला असतेच.अनित्य पृथ्वीवरचे अनित्य आपण मर्त्य मानव, आपल्या अथांग मनामुळे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची कारणमीमांसा करू लागतो. बदल माणसाला प्रवाही ठेवतो. चालत राहण्याची उर्मी देतो. आयुष्य म्हणजे एक प्रवासच, या प्रवासात घेतलेलं हजारो थांबे, चाललेल्या शेकडो वाटा, आलेले अनेक अनुभव, वाचलेले पाहिलेले भेटलेले अनेक किस्से, यांनी माणूस समृद्ध होत असतो, लेखक लिहिता होत असतो. अश्याच काही मोजक्या कथांचा हा संग्रह वाचकांच्या हाती देताना मला आनंद होत आहे-'इन द सर्च ऑफ पीकॉक'- २१व्या शतकातल्या २१ रंगांच्या २१ कथा!

 

Read More...
Hardcover
Hardcover 325

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

भावेश

काव्य -गद्य दोन्ही प्रकारांत मनसोक्त मुसाफिरी.  

उत्तम वाचन आणि शब्दसंपदेच्या जोरावर कुठल्याही विषयाला कागदावर उतरवण्याची हातोटी. 

मनस्वी विचारांच्या स्वैर निर्मितीवर भर. वाचकाशी सच्च्या भावनेतून नाते जोडावे असे लिखाण.

शब्दांचा छल आणि छळ न करता नेमके शब्द मांडणारा प्रामाणिक कवी,लेखक,माणूस. 

अनुभव आणि शब्दांची सांगड घालून वाचकाला वास्तवदर्शी अनुभूती देणारा लेखक. 

महाराष्ट्र टाइम्स, प्रतिलिपी, स्टोरीमिरर अश्या  माध्यमातून पुरस्कारप्राप्त लिखाण. 

' इन द सर्च ऑफ पिकॉक' या त्याच्या पहिल्या कथासंग्रहातल्या कथा या वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणाऱ्या आहेत. 

वेगवेगळ्या अनुभवांना मानवी प्रतिक्रिया, भावना, सामोरे जात लेखकाने त्यांना शब्दांत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

Read More...

Achievements

+3 more
View All