Share this book with your friends

Jathe Nhi Yeki / जठे नही येकी (अहिराणी- मराठी बालकथा)

Author Name: Dr. Sudhir Rajaram Deore | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

पुस्तकाबद्दल दोन शब्द 

         इसापनितीच्या गोष्टी वाचून आणि परिवेषातल्या स्वानुभवातून बालपणी लिहिलेल्या बालपणातल्या गोष्टी म्हणजे हा बालकथासंग्रह. ‘जिथे नाही एकता’ ह्या अहिराणी बालकथा संग्रहात एकूण दहा गोष्टी आहेत. लहानपणापासून लोककथा ऐकत- सांगत आलो. पाचवीपासूनच अवांतर वाचन. 

          वाईट अनुभवांतून खूप शिकायला मिळालं. या जगण्याच्या उर्मीतूनच लिहायला लागलो. अहिराणी आणि मराठीतही अशा दोन्ही भाषांमध्ये मी कथा, कविता लिहायला लागलो होतो. मराठीतल्या कथा, कविता प्रसिद्ध व्हायला लागल्या होत्या. पण अहिराणीतल्या कथा, कविता, अहिराणी ‘ढोल’ नियतकालिक प्रसिध्द होईपर्यंत तशाच पडून होत्या. 

          अहिराणीत लिहलेल्या खूप गोष्टी अजूनही वह्यांमध्ये तशाच पडून आहेत. इथं ज्या दहा गोष्टी निवडून घेतल्या, त्या निवडण्यावेळी वय वर्ष तीन ते पंधरा अशा वयाची मुलं  डोळ्यासमोर ठेवली आहेत. याचा अर्थ मोठ्या माणसांनी या गोष्टी वाचूच नयेत, असं नाही. मोठ्या माणसांनी तर या गोष्टी आणखी मुद्दाम वाचायला हव्यात... 

- डॉ. सुधीर राजाराम देवरे

Read More...
Paperback
Paperback 160

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

डॉ. सुधीर राजाराम देवरे

डॉ. सुधीर रा. देवरे 

विद्यावाचस्पति -एम.ए.पीएच.डी.

भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक.

साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक.

अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन.

 ‘ढोल’ (अहिराणी) आणि 'संपृक्त लिखाण' या नियतकालिकांचे संपादक.      

सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती.

महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कार.

ग्रंथ लेखन:

1.  डंख व्यालेलं अवकाश, मराठी कविता संग्रह, व्दितीय आवृत्ती, नोशन प्रेस प्रकाशन, चेन्नई, २७ जून २०२१. (पहिली आवृत्ती: २६ जानेवारी १९९९, लाखे प्रकाशन, नागपूर.)

2.  आदिम तालनं संगीत, अहिराणी कविता संग्रह, व्दितीय आवृत्ती, नोशन प्रेस प्रकाशन, चेन्नई, २७ जून २०२१. (व्दितीय आवृत्ती: भाषा प्रकाशन, बडोदा. जुलै २०००,तुका म्हणे पुरस्कार, २०००)

3.  कला आणि संस्कृती : एक समन्वय, संदर्भ ग्रंथ, जुलै २००३,शब्दालय प्रकाशन,श्रीरामपूर. मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, 2002 - 2003

4.  पंख गळून गेले तरी, आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, स्मिता पाटील पुरस्कार.

5.  अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ -संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई.

6.  अहिराणीच्या निमित्ताने : भाषा, 8 एप्रिल 2014, पद्मगंधा प्रकाशन, पुणे. महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कार.

7.   अहिराणी लोकसंस्कृती, संदर्भ ग्रंथ, 8 एप्रिल 2014, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.

8.   अहिराणी गोत, अहिराणी दर्शन, 7 मार्च 2014, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.

9.  अहिराणी वट्टा, अहिराणी कथा, 7 मार्च 2014, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.

10.  माणूस जेव्हा देव होतो, चरित्र, 4 जानेवारी 2014, अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा.

11.  सहज उडत राहिलो, आत्मकथन, 1 ऑक्टोबर 2016, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई.

12.  सांस्कृतिक भारत,राज्यनिहाय लेख, 15 डिसेंबर 2017, मेनका प्रकाशन, पुणे.

13.  माणसं मरायची रांग,कथासंग्रह,1 जानेवारी 2019,विजय प्रकाशन, नागपूर.

14. मी गोष्टीत मावत नाही, कादंबरी, 25 फेब्रुवारी 2019, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.

15. टिंब, कादंबरी, 15 ऑगष्ट 2019,सहित प्रकाशन, गोवा.

16. आस्वाद : भावलेल्या कवितांचा,समीक्षा, मार्च 2020,वर्णमुद्रा प्रकाशन, शेगाव.

17. ब्लॉगच्या जाळ्यातून जग, लेखसंग्रह, 25 सप्टेंबर 2020, दिलीपराज प्रकाशन, पुणे.

18. Melodies with a Primitive Rhythm, Translation in English by Rajeev Kulkarni,7 April 2021, Notion Xpress Publication, Chennai.

19. आदिम तालाचं संगीत, मराठी भाषांतर, स्वत:, १० एप्रिल २०२१, नोशन प्रेस पब्लि

Read More...

Achievements

+4 more
View All