Share this book with your friends

Kavyrang / काव्यरंग मनी काव्यछटा पसरून ...

Author Name: Prakashsingh Kisansingh Rajput | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

"काव्यरंग" हा माझा  मराठी संग्रह आपणासाठी देण्यात मला निश्चित खूप मोठा आनंद होत आहे . काव्यरंग जीवनातील अनेक रंगांना स्पर्श करणारे आणि भाव व्यक्त झालेले आहे . यातील कविता निश्चितच आपल्या जीवनातील प्रत्येक बाजूला स्पर्श  करत आहे. जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला सोबत असणारे, मानवी मनाला निश्चितच फलदायी अशी ऊर्जा देऊ पाहणाऱ्या या कवितांचा संग्रह या स्वरूपाने आपणापर्यंत पोहोचविण्यात येत आहे एक आत्मिक शांतता, सकारात्मक जीवन जगण्याची शक्ती, प्रेरणा तसेच चिंता  मुक्त जीवन होण्यासाठी तसेच आत्मविश्वास भरपाई होत नाविन्यपूर्ण  काव्यछटा आपल्या जीवनाला स्पर्श करून जाणार  आहे.
         देवाला साद घालणारे, मनाच्या कित्येक रंगछटा,निसर्गाशी नाती जोडून राहणारे , शुक्रतारा सह प्रेमधारा.....अशा अनेक बाबी काव्यलेखनातून प्रकट झालेल्या आहेत. निश्चितच आपणांस एक वेगळी अनुभुती यातून मिळणार आहे.

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत

"काव्यरंग" या काव्यसंग्रहाचे लेखन श्री प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत यांनी केले आहे. त्यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९८१ ला अजिंठा या गावी झाला. ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावत असून, शाळेतील विविध उपक्रमामुळे  त्यांचा राज्यभर कार्यविस्तार होत त्यांनी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या सोशल मिडियातील समूहामार्फत डिजिटल शाळा, सोलार ऊर्जा वापर आकर्षक व सुंदर शाळा असा नवा आयाम स्वतःच्या शाळेला तर दिला सोबतच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील मराठी भाषिक बेळगांव पर्यत ही चळवळ कित्येक वर्षापासून सुरु ठेवलेली आहे. हरित शाळा अभियान औरंगाबाद याचे अभियान गीत ही त्यांनी लिहिलेले आहे. याच बरोबर खामनदी शुद्धिकरण प्रकल्पावर लिहिलेले गीत ही उपयुक्त ठरले आहे.

         एकंदरीत तंत्रस्नेही , उपक्रमशिल व कवी अशी वेगळीच ओळख त्याची निर्माण झालेली आहे. 

Read More...

Achievements