Share this book with your friends

Veleche Yashvi Vyasthapan / वेळेचे यशस्वी व्यवस्थापन

Author Name: Shubham Undirwade | Format: Paperback | Genre : Others | Other Details

आपल्या सर्वांना दिवसात २४ तास म्हणजेच ८६४०० सेकंद मिळतात. परंतु काहींना हा वेळ पुरतच  नाही तर काही यातून जास्तीतजास्त उपयुक्त गोष्टी करतात. वेळेचे व्यवस्थापन हा प्रत्येकाच्या गरजेचा आहे.वेळेचे व्यवस्थापन म्हणजे तुम्ही तुमचा रिकामा वेळ कसा योग्य पद्धतीने वापरता याचे नियोजन. तुमच्याकडे नियोजनच नसेल तर तुमच्याकडे मोकळा वेळही उरणार नाही. 


आपण आपल्या जीवनात अंकगणितात काळ, काम, वेग ही उदाहरणे नेहमीच सोडवतो. परंतु त्यात असणारे वेळेच्या व्यवस्थापनेचे मूलभूत तत्त्व आपण मुलांपर्यंत पोहोचवत नाही व त्यामुळे ते आपल्या पुढील आयुष्यातसुद्धा समजायला खूप वेळ लागतो.व्यवस्थापन शास्त्र आणि व्यवस्थापन कलेच्या विस्तृत क्षेत्रात वेळेचा सदुपयोग या महत्त्वाच्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून 'वेळेचे यशस्वी व्यवस्थापन' हे पुस्तक अतिशय समंजस शैलीत लिहिले आहे. वेळेचे योग्य मूल्यमापन करून सदुपयोग करण्यासंबंधीचे अनेक उपाय या पुस्तकात दिले आहेत.

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

शुभम उंदीरवाडे

नमस्कार मित्रांनो,

मी शुभम उंदीरवाडे, "वेळेचे यशस्वी व्यवस्थापन"  हे माझं पहिल पुस्तक प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक आपल्या पर्यंत पोहचण्यात मला अत्यंत आनंद होत आहे.

अनेकदा मित्र-मैत्रिणी,नातेवाईक आणि इतरही व्यक्तीची एकच समस्या असते कि त्यांना स्वतःसाठी किंवा इतरांना वेळ देता येत नाही. ते वेळ कुठे जाते हेही ठाऊक राहत नाही तर या अपुऱ्या वेळेमुळे मित्र-मैत्रिणी,नातेवाईक आणि स्वतःच्या आयुष्यात सुद्धा एक पोकळी निर्माण होते. ती पोकळी भरून काढण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल.

Read More...

Achievements